Saturday, May 30, 2026
Home बॉलीवूड टॉक्सिक’च्या सेटवर कियारा अडवाणीला ‘Hi-Hello’ म्हणण्यास होती मनाई, कारण काय घ्या जाणुन

टॉक्सिक’च्या सेटवर कियारा अडवाणीला ‘Hi-Hello’ म्हणण्यास होती मनाई, कारण काय घ्या जाणुन

कियारा अडवाणी हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आणि तिने आतापर्यत काही मोजके चित्रपट केले आहेत. पण ते सर्व गाजले आहेत. तर आता ति तिच्या आता नवीन चित्रपटासाठी सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट म्हणजे ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा आहे. प्रेक्षक या यश-अभिनीत चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मूळत 19 मार्च रोजी ‘धुरंधर 2’ सोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार होती. परंतु निर्मात्यांनी शेवटच्या क्षणी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे.

कियारा अडवाणीने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेदरम्यान, ‘टॉक्सिक’मधील तिच्या कामाच्या अनुभवाबद्दल आणि दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी तिला सेटवर कोणालाही अभिवादन करण्यास कसे मनाई केली होती, याबद्दल खुलासा केला. कियाराने एका मुलाखती दरम्यान म्हणले की, शूटिंगदरम्यान गीतू मोहनदास यांनी तिला सेटवर कोणालाही अभिवादन न करण्यास सांगितले होते, ज्यामुळे अभिनेत्रीला तिची सवय बदलावी लागली. कियारा सांगते, “गीतू म्हणाली, ‘ठीक आहे, उद्या जेव्हा तू सेटवर येशील, तेव्हा तू तुझ्या भूमिकेतच राहावं अशी माझी इच्छा आहे. मी सहसा सेटवर आल्याबरोबर लोकांना हाय किंवा गुड मॉर्निंग म्हणते. मी तशा प्रकारची व्यक्ती आहे.’ पण गीतुने या गोष्टीस मनाई केली होती.

कियारा (kiyara)अडवाणी हिने अनेक भाषेमध्ये काम केले आहे, पण ती आता ‘टॉक्सिक’ च्या माध्यमातुन कन्नड मध्ये प्रथमच काम करत आहे. तर आता तिचे चाहते तिच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. तर हा चित्रपट बाॅक्स आॅफीस वर कीती कमाइ करेल हे पाहण्यासारखे असेल.

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

उर्फी जावेदची कमाई कशी वाढली? ४०,००० वरून २,००,००० पर्यंत, म्हणाली, “टीव्हीवर चांगलं वागणं चालत नाही.”

हे देखील वाचा