मराठी सिनेसृष्टीत प्रसाद ओक सध्या आघाडीवर आहे. मग ते अभिनेता म्हणून असो किंवा दिग्दर्शक म्हणून. मागील २०२२ साली आलेल्या चंद्रमुखी या सिनेमातून त्याने दिग्दर्शक म्हणून तर पुढे आलेल्या धर्मवीर या सिनेमातून त्याने अभिनेता म्हणून कमाल दाखवली. आताही धर्मवीर भाग २ लवकरच येतोय. प्रसादने अनेक मालिका आणि चित्रपटांत आजवर कामे केली आहेत. प्रसाद अगदी मध्यमवर्गीय घरातून आला आहे. अत्यंत परिश्रमातून त्याने सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. प्रसादला सध्या त्याच्या मुलाकडून मोठे सरप्राईज मिळाले आहे.
प्रसादचा मुलगा सार्थक याचा आज वाढदिवस आहे. मात्र सार्थकने त्याच्या वाढदिवशी त्याच्या वडिलांना एक गिफ्ट दिले आहे. आपल्या २२ व्या वाढदिवशी सार्थकने वडिलांना BMW कर भेट दिली आहे. याबाबतची अधिकृत पोस्ट प्रसादची पत्नी मंजिरी ओक हिने शेयर केली आहे.
मंजिरीने लिहिले…
सार्थक जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीतली यायची.. तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता ( अजूनही आहे ). तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला ( म्हणजे ३ सप्टेंबर २००२ ) जरा मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्यानी तुला ही सायकल सरप्राईज गिफ्ट म्हणून आणली होती पण त्याला काळजी की तू ती चालवताना पडलास तर? तुला लागलं तर ? म्हणून कित्येक दिवस त्यानी तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही . (अर्थात आपण हळूच जायचो तो नसताना 🤪)
त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्या नंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच आणि तसाच आनंद ( लहान मुलासारखा ) आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे.. त्याचं कारण म्हणजे,
आज २२ वर्षांनी ( ३ सप्टेंबर २०२४ ) तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राईज गिफ्ट दिलीस… मी नको म्हणाले तर तू म्हणालास की बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. ( त्या ऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल ).
माझ्याकडे शब्द नाहियेत सार्थक… फक्त एवढच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंक चा पण…!!!
खूप मोठ्ठा हो 🧿
स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत 🙏🏽
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐♥️
मंजिरीने या पोस्ट मधून मुलाचे कौतुक केले आहे. पोस्ट वर अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. या कमेंट्स मधून सर्वांनी सार्थकचे कौतुक केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
बॅक टू बॅक फ्लॉपमुळे अक्षय कुमारचा चित्रपट पुढे ढकलला, आता या दिवशी रिलीज होणार