मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून रवी जाधव (Ravi Jadhav) यांचे नाव घेतले जाते. त्यांचा 2014 मध्ये प्रदर्शित झालेला टाईमपास चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने मराठी सिने जगतात नवनवे विक्रम तयार केले होते. या चित्रपटाचा रिमेक ‘टाईमपास 3‘ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा झाली. त्याचबरोबर अभिनेता प्रथमेश परबलाही या चित्रपटातून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. अलिकडेच प्रथमेशने तो रेड लाईट एरियामध्ये जाऊन आल्याचा किस्सा चांगलाच रंगला होता. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा मराठी सिने जगतातील एक तरुण प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. टाईमपास या चित्रपटातून त्याला घराघरात लोकप्रियता मिळाली होती. चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. तेव्हापासून अभिनेता प्रथमेश परभ वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने रोड वर डान्स केल्याचा व्हिडिओ माध्यमांमध्ये चांगलाच चर्चेत आला होता. एका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्याला हा डान्स करावा लागला होता. त्यानंतर आता प्रथमेश रेड लाईट एरियामध्ये जाऊन आल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
अलिकडेच प्रथमेश परबचा अन्य चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. याच चित्रपटावेळी त्याने या एरियाला भेट दिल्याचे वृत्त समोर आले आहे. अन्य चित्रपटात प्रथमेशची अत्यंत रावडी भूमिका पाहायला मिळाली होती. यासाठीच त्याला रेड लाईट एरियाची हेरगिरी करण्याचे काम देण्यात आले होते. त्यासाठी त्याने या एरियाला भेट दिल्याची माहिती समोर आली होती. प्रथमेशचा हा चित्रपट अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश कसा करतो यावर आधारित होता. या बहुचर्चित चित्रपटात अतुल कुलकर्णी, भुषण प्रधान हे कलाकार दिसले होते.
दरम्यान अभिनेता प्रथमेश परब सध्या त्याच्या टाईमपास 3 चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात दगडूची पुन्हा एकदा धमाकेदार एंट्री प्रेक्षकांना पाहायला मिळली. हा चित्रपट 29 जुलै 2022ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Actor Prathamesh Parab himself reveals when Prathamesh Parab goes to Delhi red light area)
आधिक वाचा-
–‘मी अभिनेता बनलो ते अमिताभ बच्चनमुळे…’, खुद्द रोहित रॉयने केला खुलासा
–Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती