‘तो सीन काढून टाका अन्यथा..’ ‘टाईमपास ३’ चित्रपटावर महाराष्ट्र एकीकरण समितीने व्यक्त केला संताप

ज्या चित्रपटाची प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागली होती. तो दिग्दर्शक रवी जाधव यांचा टाईमपास ३ चित्रपट सध्या सिनेमागृहामध्ये चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. याआधी टाईमपास आणि टाईमपास २ चे भाग चांगलेच सुपरहीट झाले होते. आता अभिनेता प्रथमेश परब आणि ऋता दुर्गुळे यांच्या प्रमूख भूमिका असलेला टाईमपास ३ जोरदार कमाई करत असतानाच महाराष्ट्र एकिकरण समितीने चित्रपटातील एका सीनवर आक्षेप नोंदवला आहे. त्याचबरोबर त्याबद्दलचे पुरावे सादर करण्याचीही मागणी केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत असलेल्या ‘टाईमपास ३’ चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या कथेचे प्रेक्षकांकडून जोरदार कौतुक होताना दिसत आहे. परंतु महाराष्ट्र एकिकरण समितीने टाईमपास ३ चित्रपटातील एका सीनवर आक्षेप नोंदवला आहे. याबद्दलची त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा सीन हिंदी ही राष्ट्रभाषा आहे संदर्भातील आहे.

या पोस्टमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने ज्यामध्ये त्यांनी चित्रपटातील या सीनबद्दल संताप व्यक्त केला आहे. ज्यामध्ये रवी जाधव तुमच्या चित्रपटात #हिंदी #राष्ट्रभाषा अशी खोटी माहिती दाखवली आहे, राष्ट्रभाषा असण्याचे पुरावे द्या अन्यथा माफी मागा. अफवा पसरवणे गुन्हा असून तो आपण करत आहात, चित्रपटातील ते दृश्य तातडीने काढून टाकावे. आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल ही अपेक्षा. असे म्हणत स्पष्ट शब्दात खडेबोल सुणावले आहेत. सध्या महाराष्ट्र एकीकरण समितीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यावर अनेक नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://www.facebook.com/marathiEkikaran

दरम्यान या चित्रपटात प्रथमेश परब, हृता दुर्गुळे, वैभव मांगले, भाऊ कदम, आरती वडगबाळकर, संजय नार्वेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि सवांद लिहिले आहेत. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या टाइमपास ३ चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. शुक्रवारी २९ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा –

बोल्डनेसचा कहर! भोजपुरी अभिनेत्रीच्या बोल्ड लूकने उडवली चाहत्यांची झोप, व्हिडिओ पाहून फुटेल घाम

‘या’ कलाकारांनी धुडकावली ‘बिग बॉस १६’ची ऑफर, सहभागी स्पर्धकांची नावे ऐकून बसेल धक्का

‘मला भारत आवडत नाही?’ सोशल मीडियावरील बॉयकॉट ‘लालसिंग चड्ढा’च्या मोहिमेमुळे दुखावला आमिर खान

Latest Post