‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून ‘टप्पू’बाबत आनंदाची बातमी! जाणून तुम्हीही व्हाल ‘हॅप्पी’

गेल्या काही दिवसांपासून, भारतातील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ शोबद्दल अनेक बातम्या येत होत्या. या शोचे अनेक कलाकार शो सोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत होते. या शोने नुकताच रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवून या वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय शोच्या यादीत प्रवेश केला आहे, पण अखेर या शोबाबत सुरू असलेल्या बातम्यांचा शेवट झाला आहे. टीव्हीचा आवडता कॉमेडी कौटुंबिक शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये टप्पूची भूमिका करून प्रसिद्ध झालेला अभिनेता राज अनादकट  याच्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून ऐकायला मिळत होते की, तो लवकरच शो सोडू शकतो.

प्रॉडक्शन हाऊसमधील काही मतभेदांमुळे राजने हा निर्णय घेतल्याचे वृत्त होते. २० डिसेंबर रोजी राजचा शूटिंगचा शेवटचा दिवस असणार होता आणि या बातमीने चाहते थोडे निराश झाले होते. परंतु आता एक आनंदाची बातमी आहे.

View this post on Instagram

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) शोमधील राज अनादकट (Raj Anadkat) हा शो सोडणार नाही. प्रॉडक्शन हाऊसच्या एका सूत्राने सांगितले की, राज काही गोष्टींमुळे खुश नव्हते, परंतु ती वेळ निघून गेली आहे आणि आता तो शोमध्ये राहण्याचा विचार करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी अशी अफवा पसरली होती की, मुनमुन दत्ता (Munmun Dutta) शो सोडणार आहे. कारण, एका व्हिडिओमध्ये जातीयवादी शब्द वापरल्याने तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते. परंतु तिने शोचे शूटिंग सुरूच ठेवले होते. काही काळापूर्वी मुनमुन आणि राजच्या अफेअरच्या (Munmun Dutta And Raj Anadkat Affair) बातम्याही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. त्यानंतर असा अंदाज लावला जात होता की, या कारणामुळे तो शो पुढे चालू ठेवू इच्छित नाही.

View this post on Instagram

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

माध्यमांतील वृत्तानुसार, राजने प्रॉडक्शन हाऊससमोर आपले विचार मांडले. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. तो क्षणिक टप्पा होता, जो पार पडला. प्रत्येक अभिनेत्याच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. राजचे ‘टप्पू’ हे पात्र प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि याच कारणामुळे शो सोडणे हा विनोद नाही. त्यांना इतर काही समस्या असतील, तर तेही लवकरच सोडवल्या जातील.

राज २०१७ मध्ये शोमध्ये सहभागी झाला होता. भव्य गांधींच्या जागी त्याने ‘टप्पू’ची भूमिका साकारली होती. ‘जेठालाल’ (दिलीप जोशी)च्या मुलाच्या भूमिकेत त्याला चांगलीच पसंती मिळाली.

हेही वाचा-

Latest Post