असे काय झाले की, अमिताभ बच्चन यांच्यासमोरच हरभजन सिंग लागला रडू, पाहून बिग बीही झाले भावुक


छोट्या पडद्यावर अनेक प्रसिद्ध रियॅलिटी शो आहेत, जे वर्षोनुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ होय. केबीसीची लोकप्रियता आपण यावरून लावू शकतो की, या शोचे सध्या १३ वे पर्व सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत आपल्या आयुष्यातील मजेशीर, चांगल्या-वाईट गोष्टी शेअर करत असतात. शुक्रवारी (१७ डिसेंबर) माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यांनीही हॉटसीटवर बसून बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, यावेळी असे काहीतरी झाले की, हरभजन सिंगला अश्रू अनावर झाले.

अमिताभ यांनी हरभजनच्या फर्माइशवर गायले गाणे
‘केबीसी’मध्ये हजेरी लावणारा प्रत्येकजण अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्याकडे काही- ना- काही फर्माइश करतोच करतो. असेच हरभजननेही केले. त्याने बिग बींना त्यांच्या आवाजात बंगाली गाणे ‘एकला चोलो रे’ हे गाणे ऐकायचे आहे, असे सांगितले.

त्यावर अमिताभ यांनी सांगितले की, हे गाणे खूपच कठीण आहे. मात्र, तरीही ते हे गाणे गातात. जे ऐकून प्रेक्षकांसोबतच हरभजन (Harbhajan Singh) आणि इरफानही (Irfan Pathan) त्यांच्या गाण्याचा आनंद लूटतात.

याव्यतिरिक्त बिग बींनी दोन्ही क्रिकेटपटूंसोबत भांगडाही केला आणि क्रिकेटही खेळले. प्रेक्षकांनी बिग बींना हरभजनच्या चेंडूंवर शॉट लगावतानाही पाहिले.

अमिताभ बच्चन यांनी दिले हरभजनला सरप्राइज
अमिताभ बच्चन यांनी एपिसोडदरम्यान एक भन्नाट सरप्राइज दिले. खरं तर, त्यांनी हरभजनच्या मुलीचा आणि त्याच्या पत्नीचा व्हिडिओ मेसेज दाखवला होता. ज्यामध्ये त्याची मुलगी हिनाया हीर त्याला जगातील सर्वात चांगले वडील सांगताना दिसतेय. तसेच ती त्याच्यासाठी आपले प्रेमही व्यक्त करताना दिसली.

यानंतर मात्र हळव्या हरभजनला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो रडू लागला. हरभजनला असे रडताना पाहून खुद्द अमिताभही भावुक होतात.

हरभजनने सांगितले की, त्याच्या मुलीपासून दूर राहणे त्याच्यासाठी कठीण आहे. वयाच्या १३ व्या वर्षी त्याच्या आई-वडिलांनी त्याला हॉस्टेलमध्ये सोडले होते, ज्यामुळे तो आज या टप्प्यावर आहे. त्याने पुढे सांगितले की, त्याला आपल्या मुलीला पाहून रडायला येते.

‘केबीसी’च्या सेटवर कोणताही सेलिब्रिटी भावुक होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींना अश्रू अनावर झाले आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!