राणा डग्गुबत्तीने ४० अंडी खात, दिवसभर जिममध्ये घाम गाळत साकारली होती भल्लालदेवची भूमिका


‘बाहुबली’ चित्रपटात भल्लाल देवची संस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबत्ती (Rana Daggubati) त्याच्या चित्रपटांतील वेगवेगळ्या भूमिकांसाठी सतत चर्चेत असतो. राणा हा दक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार आहे. अभिनेता असण्यासोबतच राणा एक चांगला फोटोग्राफर देखील असून, त्याचे वडील डी सुरेश बाबू तेलुगू सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. राणा त्याचा मंगळवारी (१४ डिसेंबर) ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

राणाचा जन्म १४ डिसेंबर १९८४ रोजी झाला. राणा डाव्या डोळ्याने पाहू शकत नाही. त्याला डाव्या डोळा लहानपणी कोणीतरी दान केला होता. पण त्याला त्या डोळ्याने कधीच दिसले नाही. एका शोदरम्यान राणा म्हणाला होता, “मला उजव्या डोळ्याने दिसते. मी फक्त माझ्या उजव्या डोळ्याने पाहतो. जर मी माझा उजवा डोळा बंद केला, तर मला काहीही दिसत नाही.”

राणाने कोनिक इन्स्टिट्यूट ऑफ इमेजिंग अँड टेक्नॉलॉजीमधून फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने चेन्नईमध्ये अनेक माहितीपट आणि जाहिरातींचे दिग्दर्शन केले. त्यानंतर तो हैदराबादला आला आणि वडिलांचे प्रोडक्शन हाऊस सांभाळू लागला. राणाने २०१० मध्ये ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

राणा हा अभिनेता कमल हासन आणि श्रीदेवी यांचा मोठा चाहता आहे. ‘बाहुबली’मधील भूमिकेसाठी त्याने कमल हसनच्या ‘नायकन’कडून प्रेरणा घेतली. यानंतर त्याने अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले पण ‘बाहुबली’ या चित्रपटातून राणाने उंच भरारी घेतली. राणा हा समाजसेवेसाठीही ओळखला जातो.

या चित्रपटासाठी राणाने १०० किलो वजन केले होते. यासाठी त्याने अनेक तास जिममध्ये घालवले. राणाला दिवसाला ४० अंडी खावी लागत होती. याशिवाय दर दोन तासांनी त्याला काहीतरी खावे लागत असे. राणाने त्याच्या शरीरासाठी खास ट्रेनरही नेमला होता. राणाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. त्याने ‘बेबी’, ‘दम मारो दम’, ‘गाजी अटॅक’, ‘हाऊसफुल्ल ४’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहेत.

हेही वाचा –

शर्टलेस होऊन उणे एक तापमानात धावला टायगर श्रॉफ, दिशा पटानीने व्हिडिओवर केलेली कमेंट होते व्हायरल

लग्नानंतर कॅटरिना-विकी यांना कलाकारांनी दिल्या महागड्या भेटवस्तू, रणबीर-सलमानचे गिफ्ट ऐकून नक्कीच होतील डोळे पांढरे

एन्ट्रीचा सुंदर फोटो शेअर करत कॅटरिनाने लिहिली भावनिक नोट; म्हणाली, ‘आम्ही बहिणी नेहमी…’


Latest Post

error: Content is protected !!