कॅटरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नानंतर चाहते तिच्या लग्नाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांचा उत्साह लक्षात घेऊन कॅटरिना आणि विकीने त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नातील प्रत्येक विधीचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेहंदी आणि हळदी समारंभाचे फोटो शेअर केले. दरम्यान तिने पुन्हा एकदा काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या बहिणी आणि तिच्या मैत्रिणी फुलांची चादर धरलेल्या दिसत आहे.

कॅटरिना कैफने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना अतिशय भावनिक नोट लिहिली आहे. तिने या नोटमध्ये असे लिहिले आहे की, “मोठे होत असताना आम्ही बहिणी नेहमी एकमेकांच्या सोबत राहिलो आणि एकमेकींचे रक्षणही केले. त्या माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत. आम्ही नेहमीच एकमेकांना जीवनाशी जोडून ठेवणार आणि हे नेहमी असंच राहणार.” कॅटरिना कैफच्या पोस्टवर ८ लाख ५६ हजार पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. या फोटोवर कॅटरीनाच्या चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट केल्या आहेत. (katrina kaif writes an emotional note for sisters after marriage shares entry photos)

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

काही युजर्सने या फोटोवर फायर आणि हार्ट इमोजीचा पाऊस पाडला आहे. तर अनेक युजर्सने कमेंट करून या फोटोवर प्रेम व्यक्त केले आहे. शिवाय काहींनी त्या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here