शर्टलेस होऊन उणे एक तापमानात धावला टायगर श्रॉफ, दिशा पटानीने व्हिडिओवर केलेली कमेंट होते व्हायरल

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ने फिल्मी दुनियेत खूप वेगाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो त्याच्या चित्रपटांमधील उत्कृष्ट डान्स आणि धमाकेदार ऍक्शनसाठी ओळखला जातो. इतकेच नाही, तर टायगर नेहमीच त्याच्या चाहत्यांना वर्कआउटसाठी प्रेरित करताना दिसतो. याच कारणासाठी तो सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करतो. ज्यामध्ये त्याचे वर्कआउट आणि फिटनेस पाहून चाहते वेडे होतात. त्याचवेळी, आता टायगरने असेच काहीसे केले आहे, ज्यानंतर केवळ चाहतेच नाही, तर सेलिब्रिटींही वेडे झाले आहेत.

टायगरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो थंडीत शर्टलेस होऊन धावताना दिसत असून, तो चक्क उणे एक एवढ्या कमी तापमानात धावत आहे आणि खुद्द टायगरने त्याच्या कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

या व्हिडिओसोबत टायगरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझा दिवस सुरू करण्यासाठी काही निसर्ग क्रियोथेरपी. -१ डिग्री.” टायगरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांतच हा व्हिडिओ तीन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, त्यावर सर्वच कमेंट्स करताना दिसत आहेत. फॅन्ससोबतच कलाकारही या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत टायगरचे कौतुक करत आहे. टायगरची कथित गर्लफ्रेंड असणाऱ्या दिशा पटानीनेही या व्हिडिओवर कमेंट करून तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले की, “लोल.”

रकुल प्रीत सिंगने या व्हिडिओवर लिहिले, “वाह या थंडीत कसे?” टायगर श्रॉफच्या या व्हिडिओवर कमेंट करताना अभिनेता राहुल देवने ‘शानदार’ लिहिले आहे, तर एली अवरामने लिहिले आहे, “ठीक आता पुढची पातळी.” सोबतच त्याचे चाहते व्हिडिओवर प्रेम व्यक्त करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

गेल्या महिन्यातही टायगरने त्याचे काही फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या फोटोंमध्ये अभिनेता बर्फवृष्टीमधे शर्टलेस होऊन पोज देताना दिसला होता. यावेळी त्याने फक्त काळ्या रंगाचा पायजमा घातला होता. टायगरसोबत या फोटोंमध्ये निर्माता जॅकी भगनानीही होता. यादरम्यान, टायगरच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणाही दिसल्या. कदाचित तो मेकअप असावा.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर टायगर श्रॉफ सध्या त्याच्या आगामी ‘गणपत’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेनन दिसणार असून, तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

हेही वाचा :

‘गोष्ट काळाइतकीच जुनी’, म्हणणाऱ्या मिथिला पालकरचा आयकॉनिक लूक पुन्हा एकदा चर्चेत

हातावरील टॅटूमागील गोष्ट सांगत, ‘जीव माझा गुंतला’ मधील ‘मल्हार’ने केला खास फोटो शेअर

सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग करणार एकत्र तिसरा चित्रपट, स्कॉटलंडमध्ये झाला शूटिंगला आरंभ

Latest Post