अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे सध्या दोन गोष्टींमुळे चर्चेत आहेत. एक म्हणजे त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमामुळे आणि दुसरे म्हणजे, त्यांच्या जन्माला येणाऱ्या बाळामुळे. त्यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. त्यामुळे सिनेमाचे दिग्दर्शक आणि स्टारकास्टही चांगलीच खुश आहे. रणबीर आणि आलिया सध्या एकत्र खूप चांगला घालवत आहेत. त्यांना त्यांच्या बाळाच्या जन्माचीही उत्सुकताही लागली आहे. आलिया लवकरच कपूर खानदानाला वारसदार देणार आहे. त्यामुळे या जोडप्याने त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी चांगलीच तयारी केली आहे.
आलिया आणि रणबीरने बनवला होणाऱ्या बाळासाठी शानदार खोली
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत खुलासा करण्यात आला की, आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या बाळासाठी खोली तयार करण्यात आली आहे. चर्चेदरम्यान रणबीरने म्हटले की, बाळासाठी ते दोघेही खूप उत्साही आहेत. सोबतच त्याने हेही सांगितले की, दोघांमध्ये बाळाबद्दल कधीकधी भांडणेही होतात. तो म्हणाला की, “आम्ही बाळासाठी पूर्ण तयारी केली आहे. याबद्दल आम्ही चेकलिस्ट बनवली होती, जी आता पूर्ण झाली आहे.”
आलिया आणि रणबीरमध्ये होतो जन्माला येणाऱ्या बाळावरून भांडण
यादरम्यान रणबीरने मजेशीर अंदाजात सांगितले की, “आमच्यात बाळासाठी अनेकदा भांडणही होते. सध्या माझे आलियासोबत बालसंगोपन पुस्तकावरून भांडण सुरू आहे. आलियाने पालकत्वाचे पुस्तक वाचले आहे. यामुळे आमच्यात भांडण होते. मी नेहमी आलियाला म्हणतो की, आपण आपल्या बाळाला कसे संस्कार द्यायचे, हे पुस्तक आपल्याला शिकवणार नाहीये. हे सर्व आपला अनुभव आपल्याला शिकवेल.”
View this post on Instagram
जोडप्याने लग्नाच्या 2 महिन्यांनंतर केली होती प्रेग्नंसीची घोषणा
रणबीर आणि आलिया यांनी 14 एप्रिल रोजी कुटुंब आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केले होते. लग्नाच्या जवळपास 2 महिन्यांनंतर आलियाने सोशल मीडियावर रुग्णालयातील एक फोटो शेअर करून ती लवकरच आई बनणार असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे, त्यांनी लग्नाच्या आधी 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते.
हेही वाचा- सुखी संसार मोडून गर्लफ्रेंडसोबत राहत होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, नावे पाहून तुम्हीही व्हाल थक्क
आलिया आणि रणबीरचे सिनेमे
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघेही नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात झळकले. त्यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल कमाई करतोय. या सिनेमानंतर आलियाच्या खात्यात ‘हार्ट ऑफ स्टोन’, ‘तख्त’, ‘बैजू बावरा’, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ यांसारखे सिनेमे आहेत. तसेच, दुसरीकडे रणबीरच्या खात्यात ‘ऍनिमल’ हा सिनेमा आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अभिनेत्री बिपाशाचा प्रेग्नंसीबद्दल हैराण करणारा खुलासा; म्हणाली, ‘मी पूर्ण दिवस टॉयलेटमध्ये…’
फ्लॉप सिनेमानंतर आमिरने गाठलेली अमेरिका, सुट्ट्या संपवून परतला भारतात; ‘या’ सिनेमाचा बनवणार रिमेक