Sunday, May 19, 2024

फ्लॉप सिनेमानंतर आमिरने गाठलेली अमेरिका, सुट्ट्या संपवून परतला भारतात; ‘या’ सिनेमाचा बनवणार रिमेक

‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान होय. आमिरचा शेवटचा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’कडून चाहत्यांना भरपूर अपेक्षा होत्या. मात्र, हा सिनेमा चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला. यानंतर आमिर कामातून ब्रेक घेऊन व्हॅकेशनसाठी यूएसला गेला होता. अशात आता तो परत भारतात आला आहे. तसेच, त्याच्या आगामी सिनेमावर कामही करण्यासाठी सज्ज झाला आहे. अपेक्षा केली जात आहे की, तो लवकरच या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात करेल.

आगामी सिनेमा असेल रिेमेक
मागील काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये अशा बातम्या होत्या की, आमिर खान (Aamir Khan) हा ‘चॅम्पियन्स’ या स्पॅनिश सिनेमाच्या रिमेकवर काम करेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो लवकरच या सिनेमाची शूटिंग सुरू करणार आहे. जानेवारी 2023मध्ये या सिनेमाच्या रिमेकची शूटिंग केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. वृत्तांनुसार, या सिनेमात आमिर दिग्दर्शक आर एस प्रसन्न यांच्यासोबत काम करणार आहे. तसेच, सिनेमाच्या संगीताची धुरा शंकर एहसान लॉय यांच्या खांद्यावर असेल.

यापूर्वी आमिरने हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गंप’ या सिनेमाचा ‘लाल सिंग चड्ढा‘ (Laal Singh Chaddha) हा हिंदी रिमेक बनवला आहे. या सिनेमाला आमिरने 4 वर्षे दिले होते. मात्र, तरीही या सिनेमाला यश मिळाले नाही. या सिनेमाला परदेशात फक्त 59 कोटी रुपयांची कमाई करता आली होती. असे असले, तरीही ‘चॅम्पियन्स’ सिनेमाचा रिमेक आमिरची नाव नदी पार करेल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viacom18 Studios (@viacom18studios)

काय आहे ‘चॅम्पियन्स’ सिनेमाची कहाणी?
‘चॅम्पियन्स’ हा एक स्पॅनिश सिनेमा आहे. ‘चॅम्पियन्स’ या सिनेमाला सर्वोत्तम परदेशी भाषेतील सिनेमासाठी अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम क्रीडा सिनेमांपैकी एक सिनेमा आहे. यामध्ये शारीरिकरीत्या अपंग अभिनेत्याला कास्ट करण्यात आले होते. अशात आमिर सिनेमाच्या कास्टिंगमध्ये कोणाची निवड करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, सिनेमाच्या कास्टिंगबाबत कोणतीही माहिती समोर आली नाहीये.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी नग्न असताना अन् अंघोळ करताना त्यांनी मला पाहिलंय’, प्रसिद्ध गायिकेने कुणाविरुद्ध केला धक्कादायक खुलासा?
मानलं भावा तुला! रश्मिकापुढे शर्टची बटणे काढून चाहत्याने मागितला ऑटोग्राफ, लाजून लाल झाली अभिनेत्री

हे देखील वाचा