बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत एनर्जेटिक अभिनेता म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंग नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे सतत चर्चेत असतो. लवकरच त्याचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ’83’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासोबतच रणवीर त्याचा शो ‘द बिग पिक्चर’मुळे देखील लाइमलाईट्मधे येत असतो. या शोच्या निमित्ताने रणवीर पहिल्यांदाच सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये तो त्याच्या स्टाईलमुळे, त्याच्या अनोख्या अंदाजामुळे अधिकच मजा घेऊन येतो.
रणवीर सिंग या शोमध्ये प्रत्येक स्पर्धकांसोबत खूप धमाल करताना दिसतो. सध्या या शोचा एक नवीन प्रोमो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये रणवीर लुंगी डान्स गाण्यावर नाचताना दिसत आहे. ‘द बिग पिक्चर शो’मध्ये एका स्पर्धकावर खुश होऊन त्याने त्याची बायको आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या गाण्यावर लुंगी डान्सवर मजेशीर डान्स केला. या डान्समुळे शोमध्ये एक वेगळीच मजा आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले.
या प्रोमोमध्ये रणवीरने त्याच्या ड्रेसवर पांढऱ्या रंगाची लुंगी विचित्र पद्धतीने गुंडाळत जो डान्स केला तो पाहून बघणाऱ्यांना हसू आवरणार नाही. या प्रोमोमध्ये रणवीरसोबत एक स्पर्धक दिसत असून, तो देखील लुंगी गुंडाळून नाचताना दिसत आहे. या डान्सच्या वेळी रणवीरमध्ये दिसणारी एनर्जी आणि त्याच्या मजेशीर डान्स स्टेप्स प्रेक्षकांना थरकायला लावत आहे. सध्या या व्हायरल होणाऱ्या प्रोमोवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत असून, त्यांना रणवीरचा हा अंदाज खूपच आवडत आहे.
रणवीरने या शोमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीला प्रपोज केले होते. सैफ आणि राणी या शोमध्ये ‘बंटी और बबली २’ सिनेमाला प्रमोट करायला आले असताना त्याने राणीला प्रपोज केले. सध्या रणवीरचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा तुफान गाजत असून, या सिनेमात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा
-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे
-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका










