मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जोडी अभिनेता रितेश आणि जिनिलीया देशमुखची आहे. या दोघांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. रितेश आणि जिनिलीया सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत शेअर करत असतात. त्याच्या पोस्टवर चाहते प्रेमाता वर्षाव करताना दिसतात. यादरम्यान, रितेश आणि जिनिलीयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घालत आहे.
व्हिडिओ शेअर करताना रितेशने (Riteish Deshmukh) लिहिले की, “काजू बदामआणि पिस्ता. अर्थातच बायको..” तसेच या व्हिडिओमध्ये काही मजेशीर गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या व्हिडिओमझध्ये रितेश म्हणतो की, “बायकोने कितीही काजू-बदाम खाल्ले, तरीही ती नेहमी नवऱ्याचीच कोंडी करते असते.” त्याचा हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी खूप साऱ्या कमेंंट केल्या आहेत. कमेंट करत एका युजरने रितेशला प्रश्न विचारला आहे. त्याने लिहिले की, “तू वहिनीला काजू-बदाम आणून का देतोस?” दुसऱ्याने लिहिले की, “मला पण रितेश-जिनिलीयासारखे सुंदर वैवाहिक आयुष्य हवे” रितेशने शेअर केलेल्या या व्हिडिओला काही तासाच 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.
दरम्यान, अतिशय गोड आणि क्युट कपल म्हणून रितेश आणि जिनिलीयाची खरी ओळख आहे. ते दोघं नेहमीच त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून कपल गोल्स देताना दिसतात. ते बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर आहेत. रितेशने मराठीमध्ये देखील काम करत अनेक चांगले सिनेमे केले आहे. रितेशने मागच्यावर्षी दिग्दर्शनात देखील उडी मारली. त्याने ‘वेड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखच्या ‘वेड’ या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेडच लावले. या सिनेमातील रितेश आणि जिनिलियाचा अभिनय, संगीत, गाणी सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण केले. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. (Actor Riteish Deshmukh and Genelia Deshmukh’s video went viral on social media)
अधिक वाचा-
–मुंबई सोडून कोल्हापुरात का स्थायिक झाला भरत जाधव? म्हणाला, “मला मुंबई…”
–दु:खद! प्रसिद्ध चित्रपट निर्माते अचानी रवी यांचे निधन, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा