Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड Video: प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने जिम ट्रेनरपुढे का जोडले हात? म्हणाला, ‘मला जाऊ दे…’

Video: प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने जिम ट्रेनरपुढे का जोडले हात? म्हणाला, ‘मला जाऊ दे…’

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नेहमीच तो त्याचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. त्याची फॅन फॉलोविंग पाहून त्याची लोकप्रियता आपल्याला सहजच लक्षात येईल. तो नुकताच एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. रितेश देशमुखचा हा मजेदार व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून मोठमोठे कलाकार आणि चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक चाहते आणि कलाकार त्यावर प्रतिक्रिया देत त्याच्या तब्येतीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

रितेशने जिम प्रशिक्षकाला हात जोडून केली विनंती
रितेश देशमुखने शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, रितेश त्याच्या जिम ट्रेनरसमोर हात जोडताना दिसत आहे. त्याचा हा मजेशीर व्हिडिओ पाहून चाहते व कलाकारही आश्चर्यचकित झाले आहेत. रितेश देशमुख या व्हिडिओमध्ये लेग एक्सरसाइज करत आहे. त्याने एक्सरसाइज करायला सुरुवात करताच त्याला खूप वेदना झाल्या. त्यानंतर तो म्हणतो की, “मला जाऊ दे, माझी आई माझी वाट पाहत आहे.” त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांबरोबरच अनेक कलाकार देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत.

रितेश जिनिलियाची जोडी सोशल मीडियावर आहे लोकप्रिय
रितेश देशमुख हा सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडबरोबरच त्याने मराठी चित्रपटसृष्टीतही आपला जलवा दाखवला आहे. रितेशने २०१२ मध्ये जिनिलिया डिसूझाशी लग्न केले. त्यानंतर नेहमीच या दोघांची जोडी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. ते दोघेही आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अलीकडेच दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मित्रांबरोबर मस्ती करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओवरही चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता.

रितेश देखमुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले, तर रितेश लवकरच ‘बच्चन पांडे’ चित्रपटात दिसणार आहे. रितेश देशमुखचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘बागी ३’ होता. जिनिलियाबद्दल बोलायचं झाल, तर ती लग्नानंतर कुटुंबातील सदस्यांना आपला सर्व वेळ देत चित्रपटांपासून लांब गेली आहे. रितेश आणि जिनिलिया यांना दोन मुले आहेत. बऱ्याचवेळा त्यांचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नाच्या पसरलेल्या बातम्यांवर आदित्य सीलने लावला पूर्णविराम; म्हणाला, ‘यात लपवण्यासारखं आहे तरी काय?’

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

हे देखील वाचा