Saturday, April 18, 2026
Home बॉलीवूड खूपच गोड! रितेश देशमुखने शेअर केली खास पोस्ट; मुलगा राहिलला मायेने गोंजारताना दिसला अभिनेता

खूपच गोड! रितेश देशमुखने शेअर केली खास पोस्ट; मुलगा राहिलला मायेने गोंजारताना दिसला अभिनेता

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख अनेकदा इंस्टाग्रामवर गमतीदार व्हिडिओ शेअर करत असतो. कधीकधी तो पत्नी जेनेलिया देशमुखसोबतचे व्हिडिओ शेअर करतो, तर कधी एकट्याचे. सतत काही ना काही पोस्ट करून, प्रेक्षकांचे मनोरंजक करण्याची एकही संधी तो सोडत नाही. त्याचे मजेदार व्हिडिओ दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता पुन्हा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ मजेदार नसून, खूपच गोड आहे.

रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खूप गोंडस व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तो त्याचा मुलगा राहिल देशमुखसोबत दिसला आहे. यात राहिल वडील रितेशच्या पोटावर झोपला आहे, तर रितेशही त्याला मायेने गोंजारत आहे. याशिवाय अभिनेता ‘तेरा मुझसे है पेहले का नाता कोई’ हे गाणेही गुणगुणत आहे. त्यांचा हा प्रेमाने भरलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत, रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की. “दररोज सकाळी माझ्या छातीवर तुझे डोके असावे आणि मी तुझ्यासाठी गाणं म्हणावं, यापेक्षा मोठा आनंद नाही माझ्या मुला. मी वेळ थांबवावी अशी माझी इच्छा आहे, तु इतक्या वेगाने वाढत आहेस, हे मला आवडत नाही. परंतु मला हे आवडत आहे की तु एका लिटल मॅनसारखा वाढत आहेस. तुला प्रेम, आनंद, चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी खूप शुभेच्छा . वाढदिवसाच्या शुभेच्छा राहिल.”

व्हिडिओ खालील कॅप्शनवरून असे कळून येते की, आज म्हणजेच मंगळवारी (१ जून) राहिलचा वाढदिवस होता. अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करता क्षणीच त्यावर लाईक्सचा पाऊस पडला. चाहत्यांसह बऱ्याच कलाकारांनी देखील राहिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रितेश देशमुख अखेरच्या वेळेस ‘बागी ३’ या चित्रपटात दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा