‘जॅकपॉट’ फेम सचिन जोशीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सशर्त जामीन, देश सोडण्यास बंदी

मुंबईस्थित ओंकार रिअल्टर्स आणि डेव्हलपर्सच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात स्थानिक विशेष पीएमएलए कोर्टाने सोमवारी (७ मार्च) अभिनेता-निर्माता सचिन जोशीला (Sachin Joshi) जामीन मंजूर केला. यासोबतच न्यायालयाने जोशी याच्यावर काही अटीही घातल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘जॅकपॉट’ आणि इतर काही चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सचिन जोशीला गेल्यावर्षी १४ फेब्रुवारीला अटक केली होती.

अभिनेता-निर्माता सचिन जोशी हा ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोणत्याही प्रकारे सहभागी नव्हता, असे न्यायालयाला आढळून आले आहे. विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी सचिनला जामीन मंजूर करताना ३० लाखांचा जामीन आणि त्याला देश सोडून जाण्यापासून रोखण्याच्या अटीसह जामीन दिला आहे.

विशेष म्हणजे ३७ वर्षीय अभिनेता-निर्माता सध्या प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामिनावर बाहेर आहे. मंगळवारी (८ मार्च) त्याची सविस्तर जामिनावर सुटका करण्यात आली. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, असे दिसते की आरोपीविरुद्ध मनी लाँड्रिंगचा कोणताही खटला झालेला नाही.

सुराणा डेव्हलपर्स वडाळा या ओंकार रिअलटर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (ORDPL) च्या उपकंपनीने झोपडपट्टीवासीयांची संख्या आणि एफएसआय (फ्लोर स्पेस इंडेक्स) ४१० कोटी रुपयांपर्यंत वाढवून पुनर्विकास प्रोजेक्टसाठी फसवणूक केल्याचा दावा ईडीने केला होता. ईडीने म्हटले होते की, त्यांच्या तपासात असे आढळून आले आहे की, सचिन जोशी (Sachin Joshi) याच्याशी संबंधित कंपनीच्या माध्यमातून ४१० कोटी रुपयांच्या कर्जासाठी मनी लाँड्रिंग करण्यात आले होते.

सचिन जोशी याच्याशिवाय ओंकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्सचे अध्यक्ष कमलकिशोर गुप्ता (६२), व्यवस्थापकीय संचालक बाबुलाल वर्मा (५१) यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

जामीनाचा आदेश दिल्यानंतर ईडीने विशेष सरकारी वकील कविता पाटील यांच्यामार्फत याचिका दाखल करून या आदेशाला आव्हान देण्यासाठी आणि जामीनाला स्थगिती देण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी मागितला. न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेची ही विनंती फेटाळली आहे.

सचिन जोशीबद्दल बोलायचे झाले, तर तो शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राचे बिझनेस पार्टनर देखील आहे. सचिनने सतयुग गोल्ड प्रकरणात राज कुंद्राविरुद्धचा खटलाही जिंकला आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दिसला आहे. याशिवाय तो ‘मुंबई मिरर’, ‘जॅकपॉट’ आणि ‘वीरप्पन’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. याशिवाय तो २०१९ मध्ये आलेल्या अमावास चित्रपटाचा एक भाग होता ज्यामध्ये तो नर्गिस फाखरीसोबत दिसला होता.

हेही वाचा –

Latest Post