बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. जो सतत स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवतो. सध्या तो त्याच्या आगामी तामिळ चित्रपट ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकसाठी शूटिंग करत आहे. मूळ चित्रपटात विजय सेतुपती आणि आर माधवन मुख्य भूमिकेत होते. या हिंदी रिमेकमध्ये सैफ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे पहिले शेड्यूल गेल्या महिन्यात यूएईमध्ये शूट करण्यात आले होते. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
या चित्रपटाबद्दल बोलताना सैफ म्हणाला की, “’विक्रम वेधा’ हा एक उत्तम चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.” हा चित्रपट आपल्या मूल्यांशी तडजोड न करणारा प्रामाणिक चित्रपट अधिकारी विक्रम याच्याभोवती फिरतो. जेव्हा तो गँगस्टर वेधाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या टीमचे नेतृत्व करतो तेव्हा दोघे आमनेसामने येतात. गँगस्टरने त्याला तीन गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे विक्रमचा बरोबर आणि चुक याबद्दल दृष्टिकोन बदलतो. (actor saif ali khan said a big thing about vikram vedha film)
सैफ पुढे म्हणाला की, “एका पातळीवर हा ऍक्शन, थ्रिलर आणि मिस्ट्री चित्रपट आहे, पण त्यात तत्वज्ञानाचा घटकही आहे. जो तुम्हाला विचार करायला लावतो. हा एक चॅलेंजिंग चित्रपट असून, त्याची स्क्रिप्टही अतिशय चतुर आहे. हे वाचायलाही मला खूप वेळ लागला.” याशिवाय सैफ ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे.
‘विक्रम वेधा’ हा चित्रपट २०१७ मध्ये आला होता. हा माधवन आणि विजय सेतुपती यांच्या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा हिंदी रिमेक चित्रपट पुष्कर आणि गायत्री यांच्या दिग्दर्शनाखाली बनत आहे. वाय नॉट स्टुडिओच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात ऋतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्याशिवाय दक्षिणात्य सुपरस्टार बाहुबली प्रभास मुख्य भूमिकेत आहे. पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.
हेही वाचा :