दिग्दर्शक सुभाष घई यांचा ‘परदेस‘ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरला. 1997 मध्ये आलेल्या या चित्रपटात शाहरुख खान आणि महिमा चौधरी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या स्टाेरीवर लोकांनी भरभरून प्रेम दिले आणि आजही या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर असते.
अलीकडेच दिग्दर्शक सुभाष घई (subhash ghai) यांनी मुलाखतीत सांगितले की, सलमान खान (salman khan) आणि माधुरी दीक्षित (madhuri dixit) यांनाही या चित्रपटासाठी खूप ईच्छा दाखवली होता. दोघांनाही हा चित्रपट करायचा होता.
सुभाष घई यांनी सांगितले की, “त्यांच्या निर्मिती संस्थेत बनलेला ‘त्रिमूर्ती’ हा चित्रपट अयशस्वी ठरला. यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही एक स्टाेरी तयार केली होती. शाहरुख खानने कंपनीसोबत 3 चित्रपट करण्याचा करार केला होता.” घई यांनी ही गोष्ट शाहरुख सांगितली. कथा ऐकून शाहरुख खानने चित्रपटासाठी होकार दिला. शाहरुख खान म्हणाला की, “मला कथा आवडली आहे. आपण एकत्र काम करू आणि एक चांगला चित्रपट बनवू.”
सुभाष घई यांनी सांगितले की, “माधुरी दीक्षितलाही हा चित्रपट करायचा होता. पण माधुरी 1997 मध्ये मोठी अभिनेत्री बनली. मला चित्रपटात छोटी कास्ट हवी होती.” घई यांनी सांगितले की, “चित्रपटाचे नाव आधी ‘गंगा’ होते. गंगाच्या भूमिकेत स्टेबलिश अभिनेत्री नसावी, अशी आमची इच्छा होती. माधुरी दीक्षितनेही या चित्रपटाला होकार दिला होता. तिला गंगा हे पात्रही आवडले. मात्र नवीन चेहरा डोळ्यासमोर ठेवून आम्ही महिमा चौधरीची निवड केली.”
सुभाष घई यांचा परदेस हा चित्रपट प्रचंड गाजला होता. 1997 मध्ये आलेला हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटाच्या स्टाेरीने सर्वांनाच वेड लावले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घातली. आजही हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या यादीत येतो. या चित्रपटात शाहरुख खानच्या व्यक्तिरेखेला खूप प्रेम मिळाले. माध्यमांतील वृत्तानुसार, या चित्रपटाचे बजेट 10 कोटी होते. तर या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 41 कोटींहून अधिक होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सलमानच्या मेव्हण्याला आठवले जुने दिवस; सांगितलं, अर्पिताशी लग्न केल्यानंतर लोक काय म्हणायचे?
‘राम सेतू’ चित्रपट वाचवू शकेल का अक्षय कुमारची डुबती नय्या, ओपनिंग दिवशी जमेल का एवढा गल्ला?