मोठ्या मनाचा ‘भाईजान!’ सलमान खान घेतली कोरोनामुळे वडिलांना गमावणाऱ्या १८ वर्षीय मुलाची जबाबदारी

Actor Salman Khan Helps 18 Years Old Students From Karnataka After His Father Death


बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या उदारपणासाठीही ओळखला जातो. तो नेहमीच गरीब आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढे येत असतो. पुन्हा एकदा तो मसीहा बनला आहे. मागील वर्षी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लावले होते, तेव्हा त्याच्या फूड व्हॅन्सने कोरोना काळात पुढे येऊन काम करणाऱ्या  व्यक्तींना जेवणाचे पॅकेट वाटले होते. अशातच त्याने पुन्हा एकदा त्याच्या उदारपणाचे दर्शन घडवले आहे.

सलमान खानने कर्नाटकच्या एका १८ वर्षीय विद्यार्थ्याची मदत केली आहे. त्या मुलाच्या वडिलांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले होते. याबाबत युवा सेनेचे नेते राहुल कनाल यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एका वृत्तपत्राचे कात्रण शेअर केले आहे. त्यामध्ये माहिती देण्यात आली आहे की, सलमानने १८ वर्षीय विद्यार्थ्याची जबाबदारी घेत त्याला आर्थिक मदत करत त्याच्या सर्व गरजाही पूर्ण केल्या आहेत, जेणेकरून त्याच्या शिक्षणासाठी पुढे त्याला मदत होईल.

खरं तर राहुल कनाल सध्या सलमान खानसोबत मिळून काम करत आहेत. कनाल यांनी असेही म्हटले आहे की, सलमान आपल्या चाहत्यांसोबत इतर व्यक्तींचीही मदत करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत उभा आहे. त्याने आपल्या टीमला हेही सांगितले आहे की, जो कोणी व्यक्ती मदत मागण्यासाठी येईल, त्याला निराश करायचे नाही. जेवढी होईल, तेवढी मदत करायची.

यापूर्वीही सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो कोरोना काळात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी बनवण्यात येणाऱ्या जेवणाची चव घेताना दिसत होता. सलमानने मागच्या वेळी गरिबांना जेवण वाटले होते.

मिड-डे सोबत बोलताना राहुल कनाल यांनी सांगितले की, सलमान खान सातत्याने त्याच्यासोबत चर्चा करत आहे. तो तेव्हापासून काम करत आहे, जेव्हापासून शासनाने १५ दिवसांसाठी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.