अरे बापरे! बॉडीगार्ड शेरा असे काही बोलला की, सलमान खानही म्हणाला, ‘आज तर हा…’


बॉलिवूड कलाकारांच्या बॉडीगार्डबद्दल सर्वसामान्यांना क्वचितच माहिती असेल. मात्र, अभिनेता सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराची लोकप्रियता एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. सलमान आणि शेरा यांच्यातील बॉन्डिंग केवळ व्यावसायिक पातळीवरच नाही, तर तो त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनला आहे. सलमान कुठेही गेला, तरी शेरा त्याला संरक्षण देताना दिसतो. आता सलमान त्याच्या ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना शेराही या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला आहे.

सलमानचा वैयक्तिक बॉडीगार्ड शेरा देखील भाईजान आणि आयुष शर्माचा नवीन चित्रपट ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’च्या प्रदर्शनासाठी खूप उत्सुक आहे. शेरा गेल्या २६ वर्षांपासून सलमानसोबत काम करत आहे. शेरा शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) प्रदर्शित होणाऱ्या ‘अंतिम’चा एक लोकप्रिय डायलॉग बोलला आहे. यामध्ये पुढे शेरा घाबरताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ सलमान आणि शेरा यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

सलमानने शेअर केला व्हिडिओ
सलमानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शेरासोबत दिसत आहे. दोघांनी काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. सलमान समोर उभा आहे, तर शेरा त्याच्या मागे उभा आहे आणि ‘अंतिम’ चित्रपटाचे डायलॉग बोलत आहे.


शेरा बोलला डायलॉग
व्हिडिओमध्ये शेरा म्हणतो की, “ज्या दिवशी ही सरदाराची हटेल, त्या दिवशी सगळ्यांची फाटेल… आज या सरदाराची हटली.” शेरा आधी स्वतःकडे बोट दाखवत आणि नंतर सलमानकडे बोट दाखवत हा डायलॉग म्हणतो. शेराचा डायलॉग ऐकल्यानंतर सलमान हसायला लागतो आणि म्हणतो, “आज तर हा गेला.” व्हिडिओ शेअर करताना सलमानने शेराला टॅग केले आहे. त्याच्या या व्हिडिओ ला ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

‘अंतिम’ चित्रपट शुक्रवारी झाला प्रदर्शित
सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत आहे, तर आयुष शर्माने गँगस्टरची भूमिका साकारली आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करणारी उर्फी दिसली साडीत, पाहून नेटकरीही म्हणाले, ‘आज तू साधी साडी…’

-रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित ‘८३’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

-अनुष्का शर्माचा फोटो पाहून चाहते करू लागले विराट कोहलीचं कौतुक, काय असेल कारण?


Latest Post

error: Content is protected !!