Tuesday, June 25, 2024

बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करणारी उर्फी दिसली साडीत, पाहून नेटकरीही म्हणाले, ‘आज तू साधी साडी…’

बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आजकाल ती तिच्या अभिनयासाठी कमी आणि तिच्या विचित्र कपड्यांसाठी जास्त ओळखली जाते. तिचा ड्रेस आणि लूक पाहून अनेकदा तिचे चाहतेही तिला ट्रोल करतात. मात्र, त्यानंतरही उर्फी तिचे व्हिडिओ आणि फोटो बोल्ड अवतारात टाकण्यास मागेपुढे पाहत नाही. यावेळी तिने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे तिचे चाहतेही तिचे कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या उर्फीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने साडी परिधान केली असून, व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक गाणे वाजत आहे. व्हिडिओमध्ये उर्फी तिची अदा दाखवत आहे आणि बॅकग्राऊंडला ‘ओय होय लडकी’ हे गाणे वाजत आहे.

उर्फीच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “आज तू साधी साडी नेसली आहे, क्या बात है?” त्याचवेळी आणखी एका युजरने तिला साडीतही खूप हॉट आणि सेक्सी म्हटले. उर्फीचे चाहते या व्हिडिओबद्दल तिचे कौतुक करत आहेत आणि तिच्या सौंदर्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिला युजर्सकडून ‘हॉट’, ‘क्यूट’ आणि ‘ब्युटीफुल’ अशा कमेंट्स मिळत आहे.

https://www.instagram.com/reel/CWsGjSco6VR/?utm_source=ig_web_copy_link

एका युजरने उर्फीला ‘ब्युटी क्वीन’ म्हटले आणि ती त्याची प्रेरणा असल्याचे सांगितले. उर्फीच्या या व्हिडिओला आतापर्यंत १३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून, त्यावर शेकडो कमेंट्स येत आहेत. याआधी उर्फीने पारदर्शक ड्रेसमध्ये एक व्हिडिओ टाकला होता, ज्यासाठी सोशल मीडिया युजर्सनी तिला प्रचंड ट्रोल केले होते. आणखी एका बोल्ड व्हिडिओमुळे युजर्सनी उर्फीला ट्रोल केले आणि विचारले की, तिला लाज वाटत नाही का?

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदने पारस कलनावतला डेट केले आहे आणि दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. उर्फी आणि पारस कलनावत यांची पहिली भेट एका टीव्ही शोमध्ये झाली होती. दोन्ही कलाकारांची भेट ‘मेरी दुर्गा’ या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. हे २०१७ मध्ये घडले होते. उर्फी आणि पारसमध्ये शोच्या सेटपासून मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-असे काय झाले की, तुटले शाहरुख खानच्या मुलीचे हृदय? सुहानाने शेअर केलेला फोटो चर्चेत

-ऐकावे ते नवलंच! ब्रेकअपचे दुःख विसरण्यासाठी ‘या’ हॉलिवूड अभिनेत्याने केला प्रमाणापेक्षा अधिक सेक्स

-लंडनमध्ये भर रस्त्यात टायगर श्रॉफ दिसला ‘या’ व्यक्तीबरोबर फ्लर्ट करताना, व्हिडिओ झालाय व्हायरल

हे देखील वाचा