Saturday, June 15, 2024

कहरच अन् काय! ‘अंतिम’ चित्रपट पाहताना प्रेक्षकांनी थेट थिएटरमध्येच फोडले फटाके, सलमाननेही जोडले हात

बॉलिवूड कलाकारांचा चाहतावर्ग किती मोठा आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते कोणत्याही थराला जाऊ शकतात. याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी आला आहे. कुणी आपल्या आवडत्या अभिनेत्याचे टॅटू शरीरावर काढतात, कुणी दूर राज्यातून किंवा शहरातून आपल्या अभिनेत्याला भेटण्यासाठी पायी चालत येतात. असे नानाविध चाहते आपण पाहिले आहेत. मात्र, काही वेळा चाहते इतक्या थराला जातात की, कलाकारांनाच समोर येऊन चाहत्यांना विनंती करावी लागते. असेच काहीसे आता पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. तेही बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत.

सलमान खान आणि आयुष शर्मा अभिनित ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) प्रदर्शित झाला. सलमानच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताच, उत्साही चाहत्यांनी थेट चित्रपटगृहातच फटाके फोडले आहेत. यानंतर सलमानने फटाके फोडतानाचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना असे न करण्याची हात जोडत विनंती केली आहे. (Actor Salman Khan Shares Film Antim The Final Truth Screening Video And Asks Fans To Avoid Firecrackers Inside Theatres)

सलमानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत चाहते चित्रपटगृहात ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट सुरू असतानाच फटाके फोडताना दिसत आहेत आणि सलमान खानला चीअर करत आहेत. सलमानने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “माझ्या सर्व चाहत्यांना विनंती आहे की, चित्रपटगृहात फटाके घेऊन जाऊ नये. कारण, यामुळे आग लागू शकते. त्यामुळे तुमच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. चित्रपटगृह मालकांना माझी विनंती आहे की, फटाके चित्रपटगृहात घेऊन जाऊ देऊ नये आणि सुरक्षारक्षकांनी एन्ट्री पॉईंटवर तपासणी करावी. माझी चाहत्यांना ही विनंती आहे की, तुम्ही चित्रपटाचा आनंद लुटा. मात्र, असे करू नका. धन्यवाद.”

सलमानच्या या पोस्टला आतापर्यंत ४९ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, १० लाखांपेक्षाही अधिक लाईक्सही मिळाले आहेत, तर १८ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.

सलमान खानच्या ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटातून महिमा मकवानाने पदार्पण केले आहे. हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.

चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचं झालं, तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशी अपेक्षा केली जात आहे की, शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल.

सलमान खानच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचं झालं, तर तो ‘टायगर ३’मध्ये झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री कॅटरिना कैफही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा