Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड ‘भाईजान’च्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा, मुंबई विमानतळावर पोहोचताच पोलिसांच्या सुरक्षा घेऱ्यात दिसला सलमान

‘भाईजान’च्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा, मुंबई विमानतळावर पोहोचताच पोलिसांच्या सुरक्षा घेऱ्यात दिसला सलमान

‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खान सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी दुबईला गेला होता. आता तो मुंबईत परतला आला. शनिवारी (दि. ०६ ऑगस्ट) सकाळी सलमान मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. त्याच्यासोबत त्याचा विश्वासू अंगरक्षक शेरा आणि काही पोलीस अधिकारीही उपस्थित होते. खरं तर, सलमानला मागील काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ केली होती. विमानतळावर नेहमीप्रमाणे सलमान त्याच्या डॅशिंग लूकमध्ये दिसला. यावेळी राखाडी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाच्या पँटमध्ये सलमानने त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधले होते.

नुकतेच मुंबई पोलिसांनी सलमान खान (Salman Khan) याला बंदूक बाळगण्याची परवानगीही दिली होती. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने निवेदनात म्हटले की, “अभिनेता सलमान खान याला नुकतीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याने स्व:संरक्षणासाठी बंदूक बाळगण्याचा परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्याला तो परवाना मिळाला आहे.”

सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याची गाडीची सुरक्षादेखील वाढवली आहे. आता तो पांढऱ्या रंगाच्या बुलेटप्रूफ कारमध्ये फिरतो.

सलमान खानचे दुबईहून घरी पुनरागमन
सलमान खानचा एक दिवस आधी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो दुबईच्या मॉलमध्ये फिरताना दिसला होता. सलमानला पाहून असे वाटले नव्हते की, त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मात्र, मुंबई विमानतळावर तो पूर्ण सुरक्षा घेऱ्यामध्ये फिरताना दिसला.

सलमानचे आगामी सिनेमे
सलमानच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘टायगर ३’ आणि ‘भाईजान’ या सिनेमाच्या शूटिंग करताना दिसला होता. ‘टायगर ३’ या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) दिसणार आहे. तसेच, तो ‘गॉड फादर’ या तेलुगू सिनेमातही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त सलमान शाहरुख खान याच्या ‘पठाण’ या सिनेमातही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
“केजीएफ चित्रपट तुम्हाला कसा पाहू वाटला?” महेश मांजरेकर यांचा मराठी प्रेक्षकांना सवाल
खालून लहान अन् वरून ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिशाने घेतली जोखीम, चाहत्यांच्या गर्दीत खाली बसून घेतला सेल्फी
वयाच्या साठीत आमिरच्या बहिणीने ओलांडल्या मर्यादा, आई अन् पोरा-बाळांसमोरच पतीसोबत केले लिपलॉक

हे देखील वाचा