Friday, July 12, 2024

‘खलनायक’च्या रिमेकमध्ये रणवीरने भूमिका साकारू नये’, जाणून घ्या ‘संजू बाबा’ असे का म्हणाला

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता संजय दत्त  नुकताच ऍमेझॉन मिनीच्या ‘केस तो बनता है‘ या कॉमेडी शोमध्ये दिसला हाेता. या शोमध्ये ताे मोकळेपणाने बोलला कारण, ‘जनतेचा वकील’ रितेश देशमुख त्याच्यावर अनेक मजेदार आरोप लावत हाेता. शोदरम्यानच, अभिनेत्याने गमतीत रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबद्दल असे काही सांगितले की, तो चर्चेचा विषय बनला.

संजय दत्त (sanjay dutt) नुकताच ऍमेझॉन मिनीच्या कोर्टरूम ड्रामा ‘केस तो बना है’ मध्ये दिसला होता. शोचा होस्ट वरुण शर्माने संजय दत्तला विचारले की, “जर येत्या काळात खलनायकाचा रिमेक बनवला गेला तर या तीन स्टार्सपैकी कोणाला हे पात्र साकारू नये असे तुम्हाला वाटते. रणवीर सिंग, रणबीर कपूर की विकी कौशल?” या प्रश्नाच्या उत्तरात संजय दत्त म्हणाला, “रणवीर सिंग आजकाल कपडे घालत नाही.” संजयने हा विनोद रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर केला होता.ज्यामुळे बॉलीवूडमध्‍ये पूर्वी बरेच वाद झाले होते.

संजय दत्तच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तो अखेरचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसला होता. याशिवाय तो केजीएफ या साऊथ चित्रपटातही दमदार भूमिकेत दिसला होता. संजय दत्तने नुकताच ध्रुव सर्जाचा आगामी चित्रपट केडी-द डेव्हिलचा टीझर रिलीज केला आहे. यावेळी दाक्षिणात्य चित्रपटांचे कौतुक करताना ताे म्हणाला की, “बॉलिवूडने साऊथ चित्रपटांकडून शिकले पाहिजे.” आपले म्हणणे मांडत संजय पुढे म्हणतो, “मी देखील KGF चा एक भाग होतो. आता पुढे मी केडी-द डेव्हिलसाठी दिग्दर्शक प्रेमसोबत काम करत आहे. मला या प्रकल्पाकडून खूप आशा आहेत आणि मी टिमला त्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. मला भविष्यातही साऊथ चित्रपटांमध्ये काम करायचे आहे.”

याशिवाय संजय दत्त रणबीर कपूरसोबत ‘शमशेरा’ आणि अक्षय कुमारसोबत ‘सम्राट पृथ्वीराज’मध्येही दिसला होता. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सलमानच्या मेव्हण्याला आठवले जुने दिवस; सांगितलं, अर्पिताशी लग्न केल्यानंतर लोक काय म्हणायचे?

पतीला चिअरअप करण्यासठी धनश्रीने गाठले ऑस्ट्रेलिया, पोस्ट शेअर करत उर्वशाला मारला टोमणा

हे देखील वाचा