आहा कडकच ना! संजय कपूरची मुलगी शनायाने केला मीना कुमारीच्या ‘या’ गाण्यावर कथ्थक डान्स; एकदा पाहाच


बॉलिवूड कलाकारांची मुलं आता चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाली आहेत.यातीलच एक म्हणजे शनाया कपूर होय. प्रसिद्ध अभिनेता संजय कपूर आणि त्याची पत्नी महीप कपूर यांची मुलगी शनाया लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे. स्टारकिड असल्यामुळे अभिनयात पदार्पण करण्यापूर्वीच तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तिला सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच आता तिने आपला एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती देसी अवतारात दिसत आहे. (Actor Sanjay Kapoor Daughter Shanaya Kapoor Kathak Dance Perform On The Song Thare Rahiyo From Pakeezah)

दाखवली आपली प्रतिभा
शनायाला आपण पाश्चिमात्य डान्स करताना अनेकवेळा पाहिले असेल. मात्र, आता तिने आपल्यातील एक वेगळी प्रतिभा दाखवली आहे. ती या व्हिडिओमध्ये दिवंगत अभिनेत्री मीना कुमाी यांच्या ‘पाकीझा’ चित्रपटातील ‘ठाढ़े रहियों’ गाण्यावर कथ्थक डान्स करत आहे. तिने पिवळ्या रंगाचा अनारकली सूट नेसला आहे. ती आपल्या डान्स शिक्षिकेसोबत स्टेप्स करताना दिसत आहे.

चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करत शनायाने आपल्या कॅप्शनमध्ये “धैर्यवान आणि अप्रतिम शिक्षिकेसोबत सराव सत्र.” यासोबतच तिने आपल्या शिक्षिकेलाही टॅग केले आहे.

तिच्या या पोस्टवर तिची मैत्रीण नव्या नंदाने कमेंट करत लिहिले की, “ओ…ओ…ओ.” दुसरीकडे शनायाच्या व्हिडिओने चाहत्यांना भुरळ घातली आहे. एका युजरने लिहिले की, “मला तुझा अभिमान आहे.” याव्यतिरिक्त दुसऱ्या एका युजर्सने “लाजवाब” आणि “वाह” असे लिहिले आहे. तिच्या या व्हिडिओला ३ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मित्रांसोबत मस्ती
शनायाने नुकतेच इंस्टाग्राम अकाऊंटवर अनन्या पांडे आणि नव्या नवेली नंदासोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. हे फोटो शनायाच्या घराचे आहेत. जिथे गर्ल गँग एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. यादरम्यान शनाया आणि अनन्याने काळ्या रंगाच्या क्रॉप टॉपसोबतच जीन्स नेसली होती. दुसरीकडे नव्याने काळ्या रंगाचे कपडे नेसले होते. हा फोटो शेअर करून तिने “माझे थोडे वेडे,” असे लिहिले होते.

या फोटोंमध्ये त्या खूपच मस्तीच्या मूडमध्ये दिसत होत्या.


Leave A Reply

Your email address will not be published.