Sunday, October 1, 2023

हेमा मालिनींच्या आईने लग्नासाठी नकार दिल्याने, संजीव कुमार यांना आला होता हार्ट अटॅक; जन्मभर राहिले अविवाहित

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार संजीव कुमारने त्यांच्या दमदार अभिनयाने सगळ्यांना वेड लावले होते. अनेक सुपरहिट चित्रपटात काम करून त्यांनी त्यांची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. आज ते आपल्यात जरी नसले, तरीही त्यांच्या कामाच्या रूपाने त्यांचा सुगंध आजही दरवळत आहे. रविवारी (9 जुलै)ला संजीव कुमार यांची जयंती आहे. यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या काही खास गोष्टी.

संजीव कुमार यांचा जन्म 9 जुलै 1938मध्ये सुरत येथे झाला होता. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्यांनी ‘दस्तक’ आणि ‘कोशिश’ या चित्रपटांसाठी नॅशनल अवॉर्ड जिंकले आहेत. (Actor sanjeev kumar birth anniversary know some unknown fact about him)

ही गोष्ट अनेकांना माहीत नसेल की, संजीव कुमार यांचे खरे नाव हरिभाई जरिवाला हे आहे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात गुजराती नाटक आणि थिएटर्समधून केली होती. त्यांनी ‘हम हिंदुस्थानी’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम केले.

त्यांनी त्यांचा करिअरच्या सुरवातीला ‘राजा आणि रंक’, ‘बचपन’, ‘शिकार’ यांसारख्या चित्रपटात काम केले. परंतु त्यांना यातून काही खास यश मिळाले नाही. परंतु ‘खिलौना’ या चित्रपटातून त्यांना खास ओळख मिळाली. या चित्रपटातून त्यांना वेगळा मार्ग सापडला. संजीव कपूर त्याकाळी एक असे कलाकार होते जे पात्रांसोबत वेगवेगळे प्रयोग करत होते. त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाचे पात्र देखील ते खूप सहजतेने निभावत होते. 1975मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ या चित्रपटात त्यांनी ठाकूरची भूमिका निभावली होती. त्यांचे हे पात्र आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.

संजीव कुमार हे त्यांच्या कामाव्यतिरिक्त त्याच्या अफेअरमुळे देखील खूप चर्चेत होते. त्यांनी हेमा मालिनी इतक्या आवडत होत्या की, ते त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन थेट त्यांच्या आईकडे गेले होते. हेमा मालिनी यांच्या आईने त्यांच्या नात्याला नकार दिला होता. त्यानंतर ते खूप डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्यांना 1976मध्ये पहिला हार्ट अटॅक आला. यानंतर त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री विजेता पंडितची बहिण सुलक्षणा पंडित आली. सुलक्षणाने संजीव यांच्याकडे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते. परंतु संजीव यांनी नकार दिला.

संजीव कुमार एक प्रसिद्ध अभिनेते होते. परंतु त्यांनी कधीही लग्न केले नाही. त्यांची मैत्रीण अभिनेत्री अंजू महेंद्र हिने एकदा तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, “संजीव यांच्या जवळच्या अनेक माणसांनी त्यांना हे सांगितले होते की, मुली त्यांच्यावर नाही तर त्यांच्या पैशावर प्रेम करतात.” हिच गोष्ट त्यांच्या डोक्यात बसली होती.

संजीव कुमार यांना नेहमी असे वाटायचे की, ते जास्त दिवस जगणार नाहीत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, त्यांच्या कुटुंबातील एकही पुरुष 50 वर्षापेक्षा जास्त जगला नाही. संजीव कपूर यांचे देखील वयाच्या 47व्या वर्षी निधन झाले आहे.‌ त्यांचे लहान भाऊ निकुल याचा मृत्यू त्यांच्या आधीच झाला होता, तर दुसऱ्या भावाचा मृत्यू त्याच्या निधनानंतर झाला.

संजीव कुमार यांचा मृत्यू 6 नोव्हेंबर 1985 रोजी झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने आला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांचे 10 चित्रपट प्रदर्शित झाले होते. तसेच त्यांनी आणखी 3-4 चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती.

अधिक वाचा-
अश्विनी महांगडेच्या ‘या’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्री म्हणाली, “शेवटचा भाग…”
Birth Anniversary: संजीव कुमार आयुष्यभर अविवाहित असण्याचे कारण होते विचित्र, महिलांबद्दल करायचे ‘असा’ विचार

हे देखील वाचा