Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड Video: सारा अली खान कारमध्ये बसताच गरजू महिलेने मागितली मदत, पाहा काय केलं अभिनेत्रीने

Video: सारा अली खान कारमध्ये बसताच गरजू महिलेने मागितली मदत, पाहा काय केलं अभिनेत्रीने

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज ती सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा चित्रपट आणि जाहिरात चित्रपटाच्या शूट दरम्यान देखील चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी वेळ काढत असते. ती सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांशी जोडलेली असते. आता तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिचे खूप कौतुक होत आहे. सारा अली खान व्हिडिओमध्ये गरिबांना बिस्किटे वाटताना दिसत आहे.

सारासोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि आई अमृता सिंग देखील यावेळी उपस्थित होत्या. सारा तिच्या कुटुंबासह वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. यादरम्यान तिला पाहणाऱ्या चाहत्यांची गर्दी जमली होती. यादरम्यान, सलवार-सूट सोडून सारा डेनिम शॉर्ट्स आणि पांढरा हाफ शर्ट परिधान केला आहे. इब्राहिम काळ्या रंगाच्या बनियान-लाल पँटमध्ये आणि अमृता सिंग यांनी लाँग निळ्या रंगाचा डेनिम शर्ट घातला होता.

साराला बघताच काही गरीब लोक आले आणि विशेष गोष्ट अशी की, सारानेही तिला निराश केले नाही. सारा कारमध्ये बसताच तिने बिस्किट आणि काही रुपये आलेल्यांना ऑफर केले आणि त्यानंतर ती निघून गेली. साराचा हा व्हिडिओ आता तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. नेटकरी तिची जोरदार स्तुती करत आहेत. साराने आपल्या क्यूट अंदाजाने चाहत्यांची मने जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ती अनेकवेळा असे करताना दिसली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सारा अली खानने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. यानंतर ती ‘लव्ह आज कल’ आणि ‘सिम्बा’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ मध्ये दिसणार आहे. सारा अखेर वरुण धवनसोबत ‘कुली नंबर १’मध्ये दिसली होती. मात्र, हा चित्रपट विशेष कामगिरी दाखवू शकला नाही. चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शर्टची बटणं खोलून साराने हॉट फोटो केले शेअर, तिच्यावरून नजर हटविणंही झालंय कठीण

-साराचा वर्कआऊट पाहून तुमच्याही बत्त्या होतील गुल; फिगर मेंटेन करण्यासाठी ‘अशी’ घेते मेहनत

-सारा- इब्राहिमपासून ते रणबीर- रिद्धिमापर्यंत ‘या’ बहीण- भावांच्या जोड्या आहेत खूपच प्रसिद्ध; एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव

हे देखील वाचा