Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘कबीर सिंग’नंतर कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर एकत्र दिसणार? शाहिदच्या ‘त्या’ कमेंटने उडाली खळबळ

‘कबीर सिंग’नंतर कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर एकत्र दिसणार? शाहिदच्या ‘त्या’ कमेंटने उडाली खळबळ

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचा सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोविंग आहे. शाहिद त्याच्या मस्त स्वभावासाठीही ओळखला जातो. तो असा अभिनेता आहे जो कधीच वादात अडकत नाही आणि लाइमलाइटपासूनही दूर राहतो. शाहिद कपूर नेहमीच व्यावसायिक आघाडीवर समर्पित असतो. त्याचबरोबर शाहिद आणि कियारा अडवाणी ‘कबीर सिंग’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्रीही चांगलीच पसंतीस उतरली होती. शाहिद आणि कियारा या जोडीला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते. चित्रपटातील प्रीती आणि कबीरच्या प्रेमकथेने सर्वांना रोमँटिक बनवले. या चित्रपटानंतर चाहत्यांना दोघांना पुन्हा एकत्र पाहायचे आहे.

कियाराने शाहिदला (Kiara Advani) वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा  

अलीकडेच शाहिदने (Shahid Kapoor) त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा केला. त्याचवेळी कियाराने देखील अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कियाराने शाहिदला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुन्हा एकत्र काम करण्यास सांगितले आहे. खर तर, कियाराने शाहिदसोबतचा एक फोटो शेअर केला. त्यासह बर्थडे नोटमध्ये तिने शाहिदसोबतच्या ‘कबीर सिंग’ या रोमँटिक सुपरहिट चित्रपटातील एक डायलॉग देखील लिहिला आहे. तिने लिहिले की, “हॅपी बर्थडे एसके. चला लवकरच आपल्यासाठी एक चांगली स्क्रिप्ट शोधू.” त्याच पोस्टमध्ये कियाराला उत्तर देताना शाहिदने कमेंटमध्ये लिहिले, “प्रीती तुझ्याकडे तारखा कुठे आहेत.”

चाहते झाले उत्सुक

शाहिद आणि कियारा यांच्यातील या मजेदार संभाषणामुळे हे जोडपे ‘कबीर सिंग’ नंतर पडद्यावर पुन्हा एकत्र येणार असल्याच्या अंदाजांना चालना मिळाली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘कबीर सिंग’ विजय देवरकोंडा आणि शालिनी पांडे यांचा हा चित्रपट अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात ‘हैदर’ फेम शाहिदने एका जिद्दी सर्जनची भूमिका साकारली होती. या चित्रपटात शाहीद आणि कियारा यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. ‘कबीर सिंग’ हा २०१९ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.

शाहिदकडे आहेत अनेक चित्रपट 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कियारा आणि शाहिदचे चांगले चित्रपट आता प्रदर्शनासाठी तयार आहेत. शाहिद कपूर लवकरच ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय, तो राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित थ्रिलर ड्रामा वेबसीरिज तसेच अली अब्बास जफरच्या शीर्षक नसलेल्या ऍक्शन फिल्ममध्ये देखील दिसणार आहे. याशिवाय शाहिद आदित्य निंबाळकरच्या ‘वळू’ या चित्रपटातही दिसणार आहे. जो एप्रिल २०१३ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, कियारा ‘जुग जुग जिओ’ चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा