Tuesday, April 16, 2024

धनश्री काडगावकरच्या नव्या रिलने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ, चाहता म्हणतोय, ‘लय अंग दुखायले का?’

काही कलाकार असे असतात ज्यांजी कोणतीही भूमिका साकारली तरी प्रेक्षकांना आवडतात. अगदी नकारात्मक भूमिकेत असेल तरी देखील प्रेक्षकांच्या मनात ते खास स्थान निर्माण करतात. यातील एक अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. धनश्रीने झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत वहिनी साहेब ही नकारात्मक भूमिका साकारली. नकारात्मक भूमिकेत असूनही तिने प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळवले.

धनश्री (dhanashri kadgoankar) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच तिने एक ट्रेंड फॉलो करत एक रील बनवले आहे. धनश्रीने सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करत एक रील्स बनवले आहे. यावर अनेक सेलेब्सनी देखील रील्स बनवले आहेत. यामध्ये धनश्री जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CabN9cZr1G-/?utm_source=ig_web_copy_link

तिच्या या व्हि़डिओवर कमेंटसह लाईक्सचा वर्षाव होत आहे. पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये या ट्रेंडवर ती लॉनमध्ये डान्स घरताना दिसत आहे. तिच्या या डान्सवर एका चाहत्याने लक्षवेधी कमेंट केली आहे. सध्या ही कमेंट सोशल मीडियावर देखील चर्चेत आली आहे. त्याने म्हटले आहे की, ‘लय अंग दुखायले का..’ तर दुसऱ्याने “कडक,” म्हटले आहे. अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत धनश्रीच्या डान्सला पसंती दिली आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम करता असताना धनश्रीने प्रेग्नेंसी ब्रेक घेतला. तिने मागच्या वर्षी एक गोंडस मुलाला जन्म दिला. तिने तिच्या मुलाचे नाव कबीर असे ठेवले आहे. नुकतेच तिने तिच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या मुलासोबत देखील अनेक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. मध्यंतरी ती ‘घेतला वसा टाकू नको’ या ऐतिहासिक मालिकेत दिसली होती.

हेही वाचा :

हे देखील वाचा