Monday, July 1, 2024

स्वतःच्या प्रतिमेविषयी शरद पोंक्षें यांच मोठ भाष्य, म्हणाले, ‘मी राडे घालतो…’

अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या बिंधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी सतत चर्चेत येत असतात. विविध राजकीय तसेच सामाजिक विषयांवर ते परखडपणे आपले मत मांडत असतात. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाटक, चित्रपट, मालिका व आपल्या परखड विचाराने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. पण मनोरंजनसृष्टीत त्यांना बरेच लोक घाबरतात. यामागचं कारण शरद पोंक्षे यांनी स्पष्ट केले आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये अभिनेते शरद पोंक्षे सहभागी झाले होते.

मनोरंजनसृष्टीत तुमची एक वेगळीच प्रतिमा आहे. तुम्हाला लोक घाबरतात असं का? या प्रश्नाचे उत्तर देताना शरद (Sharad Ponkshe) पोंक्षे म्हणाले की, “माझ्या अभिनयाच्या कारकीर्द मला ज्या ज्या भूमिका मिळाल्या त्या खलनायकाच्या भूमिका होत्या. महत्त्वाची भूमिका म्हणजे नथुराम गोडसे. एक अत्यंत कट्टर राष्ट्रभक्त, कडक विचारवंत; ज्यांनी गांधीजींना गोळ्या मारल्या त्यांची भूमिका मी केली. ती २० वर्षं केली. या भूमिकेच्या दरम्यान खूप राडे झाले. त्याशिवाय अनेक मालिकांमध्ये देखील मला खलनायकाची भूमिका केली आहे. त्यामुळे बहुतेक माझी अशी प्रतिमा झाली आहे.”

ते पुढे बोलताना म्हणाले की, “दुसरी गोष्ट म्हणजे मला खोटं अजिबात सहन होत नाही. खोट बोललेलंही सहन होतं नाही आणि आपण अशा इंडस्ट्रीत आहोत जिथे सगळे लोक खोटं बोलतात. म्हणजे कुणाचेही खरे चेहरे दिसतच नाहीत. सगळी मुखवटे घातलेली माणसं असतात. त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. पण कारण नसताना उगाचच खोटं बोलतात. त्यामुळे माझी सटकते आणि मी राडे घालतो, भांडतो. माझी अनेक निर्माते, काही दिग्दर्शक, काही प्रॉडक्शन मॅनेजर यांच्याशी भांडणं झाली आहे. काहीना तर, माझ्या भयंकर आवाजाची भीती वाटते.”

तसेच. एखाद्या शुटिंगच्या वेळी कुणी सर म्हणालं आणि मी त्याला काय आहे? असं बोललो तरी ते ऐकून समोरचा पुढे बोलतच नाही. कधी कधी जो सीन करण्यासाठी बोलवायला आलेला असतो, तो परत जातो आणि सर ओरडले म्हणून सांगतो. मग मी समजावतो की, मी ओरडलो नाही. मी विचारलं फक्त काय आहे? अशा प्रकारे लोक घाबरतात. मी हे काही मुद्दाम करत नाही. माझ्या बरोबर ज्या लोकांनी काम केले आहे, त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. पण जे नवीन कलाकार येतात त्यांना गैरसमज होतो. या खलनायकांच्या भूमिकांबरोबर मी त्याच्या जोडीला स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारा पोहोचवण्याची जी व्याख्यानं देतो. त्या सगळ्यांमुळे माझी अशी प्रतिमा तयार झाली आहे. (Actor Sharad Ponkshe has a big comment about his image)

अधिक वाचा- 
सिनेसृष्टीवर शोककळा! वडिलांच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने अभिनेत्यानेही 25व्या वर्षी सोडले जग
काळीज तोडणारी बातमी! शाहरुखच्या सर्वात मोठ्या चाहत्याचे निधन, लगेच वाचा

हे देखील वाचा