दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीने आपल्या आयुष्यात अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. तिच्या ‘मॉम’ या शेवटच्या चित्रपटाचेही खूप कौतुक झाले. चित्रपटात ती एका सशक्त आईच्या भूमिकेत दिसली होती. तसेच या चित्रपटात श्रीदेवीच्या मुलीची भूमिका साकारणारी छोटी मुलगी आता मोठी झाली असून, ती आता खूपच सुंदर दिसते. रिवा अरोराने या सिनेमात श्रीजींच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या क्यूटनेसमुळे प्रेक्षक तिच्यावर खूपच इंप्रेस झाले होते. आता ही छोटी रिवा मोठी झाली असून, ती तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते.
रिवा अरोराबद्दल बोलायचे झाले, तर ती त्या अभिनेत्रींपैकी एक आहे की, ज्या लहानपणापासूनच सिनेमाच्या पडद्यावर दिसतात. फोटो आणि व्हिडिओ पाहता रिवा अरोरा बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत मात देताना दिसते. ती श्रीदेवीच्या खऱ्या मुली खुशी आणि जान्हवी कपूरलाही तोडीस तोड टक्कर देते.
ती अजूनही खूप लहान आहे आणि सध्या रिवा सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. नवीन ट्रेंडवर व्हिडिओ बनवून ती सतत चाहत्यांच्या यादीत समाविष्ट होते. रीवाचे इंस्टाग्राम अकाऊंटवर ४.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती इंस्टाग्रामवर मोठ्या बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांसोबत दिसते. एवढ्या लहान वयात रिवाकडे अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीही आहेत.
रिवाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर अगदी लहान वयातच तिने टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये काम तर केले, सोबतच हॉलीवूडमध्येही काम केले आहे. तिने २०१८ मध्ये ‘बेस्ट फ्रेंड्स’ नावाच्या हॉलिवूड चित्रपटात काम केले. त्याचबरोबर रिवाने वयाच्या अवघ्या १ ल्या वर्षी ‘रॉकस्टार’ चित्रपटात भूमिका साकारली. तिने टीव्ही सीरियल ‘पापा मेरे हीरो हिरालाल’ मध्येही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\
-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल
-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद










