Monday, February 26, 2024

‘आई दिवसाभरात पाच फोन करायची पण आता…’, सिद्धार्थ चांदेकरने आईच्या दुसऱ्या लग्नाविषयी केला खुलासा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने त्याची आई सीमा चांदेकर यांचे दुसरे लग्न लावून दिले होते. या लग्नानंतर सिद्धार्थने अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलले आहे. नुकतेच सिद्धार्थने एका रेडिओ शोमध्ये मुलाखती दिली आणि या मुलाखतीत त्याने आईच्या दुसऱ्या लग्नानंतर तिच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद विषयी काही गोष्टी सांगितले.

सिद्धार्थ (siddharth chandekar) म्हणाला, “आईच्या दुसऱ्या लग्नानंतर 15 ते 20 दिवसांनी मला तिचा जो चेहरा बघायला मिळाला तिचे जे डोळे बघायला मिळाले मला ते हवं होतं. लोक काय म्हणतील याच्याशी मला काहीही देणघेण नाहीये. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना पूर्ण अधिकार आहे. पण मला माहिती आहे माझी आई आत्ता एवढी आनंदी आहे. जी गेली 20 वर्ष नव्हती. गेली 20 वर्ष तिने आम्हाला सांभाळण्यात, आमच्या करिअरपाई स्वत:च्या स्वप्नांचा त्याग करण्यात घालवले आहेत.”

सिद्धार्थ पुढे म्हणाला, “मला रोज दिवसातून आईचे चार ते पाच फोन यायचे. आता मी आईला फोन करतो. ती आनंदी आहे. ती तिचा संसार करते. मला वडील मिळाले नाहीत आणि मला वडील नकोयेत. माझ्या आईला पार्टनर मिळाला आहे आणि त्यासाठी मी खूप आनंदी आहे.” सिद्धार्थच्या या मुलाखतीवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी सिद्धार्थचं कौतुक केलं आहे. त्यांनी सिद्धार्थला एक चांगला मुलगा म्हटलं आहे.

सिद्धार्थ चांदेकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाची आणि सौंदर्याची अनेक चाहते आहेत. सिद्धार्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. 2021 मध्ये ‘झिम्मा’ या मराठी चित्रपटाच्या सुपर यशानंतर, जिओ स्टुडिओ आणि आनंद एल राय यांनी त्याच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘झिम्मा 2’च्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ झळकणार आहे.

आधिक वाचा-
कपडे न घालता कॅमेऱ्याच्या समोर आली उर्फी?, मग लाजून केले ‘हे’ कृत्य; पाहा व्हिडिओ
एका पार्टीनंतर ‘असे’ बदलले अर्जुन रामपालचे अवघे आयुष्य, पाहा कसा केला मॉडेल ते अभिनेत्याचा प्रवास

हे देखील वाचा