Friday, March 29, 2024

लग्नाला आठवडा होताच कियाराला सोडून कामावर परतला सिद्धार्थ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

शेरशाह‘ सिनेमातून चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा होय. सिद्धार्थ सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही भलताच चर्चेत आहे. यामागील कारण म्हणजे, सिद्धार्थने 7 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी हिच्यासोबत संसार थाटला होता. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थित त्यांनी सात फेरे घेतले होते. अशात 15 फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ कामावरही परतला आहे. तो नुकताच मुंबईत स्पॉट झाला. यादरम्यान त्याच्यासोबत पॅपराजींनीही पोझ दिले. यादरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लग्नाच्या 8 दिवसांनंतर कामावर परतला आहे. अभिनेत्याने 7 फेब्रुवारी रोजी कियारा आडवाणी (Kiara Advani) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. यानंतर जोडप्याने आधी 9 फेब्रुवारीला दिल्ली आणि नंतर 12 फेब्रुवारी रोजी मुंबईत रिसेप्शन पार्टी ठेवली होती. दिल्लीतील रिसेप्शन मित्र आणि कुटुंबीयांसाठी ठेवले होते, तर मुंबईतील रिसेप्शनमध्ये बॉलिवूड कलाकार सामील झाले होते. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओही जोरदार व्हायरल झाले होते. अशात सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत अभिनेता मुंबईत चित्रपट लेखक शशांक खेतान (Shashank Khaitan) याच्यासोबत स्पॉट झाला. याचा अर्थ असा होतो की, अभिनेता आता कामावर परतला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओत सिद्धार्थ बॅगी पँट, निळा शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या शूजमध्ये खूपच हँडसम दिसत आहे. सिद्धार्थने त्याच्या टीमसोबत पॅपराजींसमोर पोझ दिले. आपला लूक पूर्ण करण्यासाठी त्याने गॉगल्सही घातले होते. खरं तर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या लग्नापूर्वी (Sidharth Malhotra And Kiara Advani Marriage) स्पष्ट झाले होते की, हे जोडपे त्यांच्या कामासंबंधित करारांमुळे हनीमूनला जाणार नाही. अशात सिद्धार्थचे कामावर परतणे सांगते की, त्या बातम्या खऱ्या होत्या. या व्हिडिओत सिद्धार्थ त्याच्या आगामी ‘योद्धा’ सिनेमाच्या टीमसोबत स्पॉट झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

समोर आलेल्या व्हिडिओवर अनेक युजर्स कमेंट करत आहेत. काहींनी सिद्धार्थला क्यूट म्हटले आहे, तर अनेकांनी त्याला हँडसमही म्हटले आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “सिद्धार्थच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो स्पष्ट दिसत आहे. दोघांनी कायम खुश राहावे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तू दिवसेंदिवस तरुण होत चालला आहे सिद्धार्थ.”

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या तसेच रिसेप्शनच्या फोटोंनी एकच धुमाकूळ घातला होता. फोटोतील सिद्धार्थ आणि कियाराच्या केमिस्ट्रीनेही चाहत्यांना भूरळ घातली होती. (actor sidharth malhotra back to work after 8 day of marriage with kiara advani seen shashank khaitan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
काळीज तोडणारी बातमी! 5 दशके इंडस्ट्री गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीचे निधन, मिळवलेला ‘सेक्स बॉम्ब’चा किताब

भारतीय चित्रपटाचे ‘जनक’ दादासाहेब फाळके यांनी अशाप्रकारे दिले चित्रपटांना जीवनदान, वाचा त्यांचा प्रवास

हे देखील वाचा