Friday, April 26, 2024

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कियारावर चढला प्रेमाचा रंग; अभिनेत्रीने शेअर केलीली खास पाेस्ट एकदा पाहाच

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये धूमधडाक्यात लग्न केले, ज्यामध्ये करण जोहर ते शाहिद कपूर, मीरा राजपूत, मनीष मल्होत्रा, जुही चावला यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सामील झाले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघांच्या लग्नामुळे चाहते खूप खुश होते. या दाेघांच्या फाेटाेंवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा भरभरुण वर्षाव करता आहेत. यासाेबतच अलीकडेच दोघांच्या रिसेप्शनचीही खूप चर्चा झाली. रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. दरम्यान, कियारा अडवाणीने तिच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.

फाेटाे शेअर करत कियाराने लिहिले भन्नाट कॅप्शन
कियारा अडवाणी (kiara advani) हिने व्हॅलेंटाईन डे निमित्त तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हळदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना कियाराने सिद्धार्थवरचे तिचे प्रेमही व्यक्त केले आहे. फाेटाेंमध्ये, जिथे सिद्धार्थ (sidharth malhotra) पिवळा कुर्ता आणि बहुरंगी शालमध्ये स्मार्ट दिसत आहे, तिथे कियारा जड भरतकाम असलेल्या  लेहेंग्यात खूप सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘प्यार का रंग चढा’.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सिड-कियाराच्या लग्नाच बाॅलिवूडच्या दिग्गज कलाकरांनी लावली हजेरी
नुकतेच कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचे मुंबईतील सेंट रेगिस येथे भव्य रिसेप्शन पार पडले. यादरम्यान दोघेही मनीष मल्होत्राच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होते. सिद्धार्थ मल्होत्राने चमकदार काळ्या रंगाचा टक्सिडो परिधान केला हाेता, तर कियारा एका अनोख्या फिशटेल गाऊनमध्ये दिसली. दोघेही आपापल्या लूकमध्ये अप्रतिम दिसत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावेळी रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक बाॅलिवूड कलाकरांनी हजेरी लावली, ज्यामध्ये नीतू सिंगसह करण जाेहर, आलिया भट्ट, अभिषक बच्चन, अनन्या पांडे, शिल्पा शेट्टी यासारख्या दमदार कलाकारांचा समावेश हाेता.(bollywood actress kiara advani sidharth malhotra shares haldi ceremony photos on valentine day see couple romantic chemistry in pics)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
व्हॅलेंटाईन डे स्पेशल…चित्रपटाची शूटिंग करतानाच खऱ्या आयुष्यात ‘हे’ सेलिब्रिटी अडकले होते प्रेमाच्या जाळ्यात, वाचा त्यांची ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’

पहिल्याच दिवशी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ‘शहजादा’ने केली तब्बल इतक्या काेटींची कमाई; वाचून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा