कारगीलवीर कॅप्टन विक्रम बत्रांच्या जीवनावर आधारीत ‘शेरशाह’ चित्रपटाची रिलीझ डेट आली समोर


बॉलिवूडमध्ये जंग-ए-आझादीची आठवण करून देणारे अनेक देशभक्तीपर चित्रपट सध्या येत आहेत. या चित्रपटांमध्ये देशप्रेमाची भावना आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्षाच्या वेदना देखील दाखवल्या जातात. बॉलिवूडमध्ये बरेच कलाकार देशभक्तीपर चित्रपटात काम करायला पुढाकार घेत असतात.

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​हा देखील देशभक्तीपर चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपटाचे नाव ‘शेरशाह’ असून हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे म्हटले जात होते. नुकतेच त्याच्या आगामी ‘शेरशाह’ या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. चित्रपट कारगिल युद्धाचा महान योद्धा कॅप्टन विक्रम बत्राच्या जीवनावर आधारित आहे. करण जोहर निर्मित हा महत्वाकांक्षी चित्रपट 2 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत, हे पाहून चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

सोशल मीडियावर आपल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना सिद्धार्थ मल्होत्रा याने लिहिलेे की’ “कॅप्टन विक्रम बत्राची न ऐकलेली कहाणी जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. ‘शेरशाह’ 2 जुलै रोजी रिलीज होणार आहे’. चित्रपटाचा निर्माता करण जोहरनेही हे पोस्टर पूर्ण उत्साहाने शेअर केले असून हा नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. शेरशहाच्या सेटवरचे याअगोदरही बरेच फोटो व्हायरल झाले आहेत. तरी आता या पोस्टर्सवरून, सिद्धार्थ मल्होत्राला त्यांच्या कारकिर्दीचा गेम चेंजर चित्रपट मिळाल्याचे म्हटले जात आहे.

शेरशाह चित्रपटाच्या विषयाकडे पाहता प्रेक्षकांना चित्रपट नक्कीच आवडेल, असे वाटत आहे. देशप्रेम आणि देशभक्तीने भरलेल्या अशा चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळते. अनेकांकडून असे चित्रपट मोठ्या उत्कटतेने पाहिले जातात. मग तो विकी कौशलचा ‘उरी’ असो किंवा नुकताच रिलीज झालेली वेब सीरिज ‘जीत के आगे जिद’ असो.

ज्यामध्ये भारतीय सैन्याच्या शौर्य कथा सांगितल्या जातात त्या चित्रपटांबद्दल वेगळी भावनिक जोड असते. त्यामुळे हे कनेक्शन चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हिट देखील करते. आता शेरशहाचे निर्मातेही आशावादी आहेत की कॅप्टन विक्रम बत्राच्या जीवनातील किस्से उत्साहाने भरुन टाकणारे आहेत.

शेरशाहच्या शूटिंग दरम्यान छोट्या छोट्या गोष्टींवर बरेच लक्ष दिले गेले आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या मूळ गावातील धर्मशाळेतही या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तसेच, लेह, लडाख आणि कारगिलमध्येही अनेक महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या एका चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्राने स्वतंत्रपणे वेपन ट्रेनिंगही घेतली आहे. आपल्या शरीरावरही त्याने बरीच मेहनत घेतली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.