Friday, April 19, 2024

भांडं फुटताच सुष्मिताने ललित मोदींच्या पाठीत खुपसलं खंजीर, पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडली अभिनेत्री?

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यासोबतच्या अफेअरमुळे तुफान चर्चेत आहे. ललित मोदींनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया अकाऊंटवर सुष्मितासोबतचे आपले नाते अधिकृत केले होते. सुष्मिताने आतापर्यंत ललित मोदींसोबतच्या आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले नाहीये. मात्र, तिने नुकतेच एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि कुटुंबातील सदस्यांसोबत आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोमवारी (दि. ०८ ऑगस्ट) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिने इंस्टाग्राम लाईव्ह केले होते. यादरम्यान तिने चाहत्यांसोबत तिच्या कुटुंबाच्या सेलिब्रेशनची झलक शेअर केली. ज्यावेळी सुष्मिता तिच्या आईसोबत इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत चर्चा करत होती, तेव्हा बॅकग्राऊंडमध्ये रोहमन सुष्मिताच्या मुलींसोबत चर्चा करताना दिसत होता. ललित यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांमध्ये रोहमन सुष्मिताच्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन करताना दिसल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रश्न उपस्थित करत आहे.

ललित मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो ट्विटरवर शेअर केले होते. सोबतच त्यांनी सांगितले होते की, ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. इतकेच नाही, तर ललित यांनी सुष्मिताला ‘बेटरहाफ’ म्हणत  सांगितले होते की, ते लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मात्र, त्यानंतर सुष्मिताने एक पोस्ट शेअर कत लग्नाच्या बातम्यांना नाकारले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikhil Rao (@bg0260)

तब्बल ४ वर्षांच्या नात्यानंतर वेगळे झाले होते सुष्मिता आणि रोहमन
सुष्मिता आणि मॉडेल रोहमन शॉल हे दोघेही सन २०१८पासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनीही इंस्टाग्रामवर त्यांचे रोमँटिक फोटो शेअर केले होते. मात्र, ४ वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर रोहमन आणि सुष्मिताचे ब्रेकअप झाले होते. अशात सुष्मिताच्या कुटुंबाच्या कार्यक्रमामध्ये रोहमन दिसल्याने सर्वांच्या नजरा त्या दोघांवर टिकल्या आहेत. तसेच, चाहते अंदाज व्यक्त करत आहेत की, सुष्मिता आणि रोहमन हे पुन्हा एकत्र आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
ट्रोलर्सला कंटाळून आमिरने एकदाच बोलून टाकले, ‘आता मला माफ करा’, व्हिडिओ पाहून चाहतेही भावूक
‘जर एखाद्या मुलीला सेक्स करायचा असेल, तर ती धंदा…’, प्रसिद्ध अभिनेत्याचे खळबळजनक वक्तव्य
अर्रर्र! भारती अन् तिच्या पतीने केली मोठी चूक? मुंबई पोलिसांनी धाडलं बोलावणं, सुजवून टाकला पाय

हे देखील वाचा