Tuesday, October 14, 2025
Home अन्य टिकू तलसानियांचे मराठीत पुनरागमन! ‘या’ नवीन चित्रपटातून करणार चाहत्यांचे मनोरंजन

टिकू तलसानियांचे मराठीत पुनरागमन! ‘या’ नवीन चित्रपटातून करणार चाहत्यांचे मनोरंजन

हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या साहाय्य्क भूमिकांनी प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेणारे प्रसिद्ध अभिनेता टिकू तलसानिया यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करुन इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. टिकू लवकरच मकराठी सिनेसृष्टीमध्ये पुनरागमन करणार आहेत. त्यांनी चित्रपट नाही तर मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

प्रसिद्ध अभिनेता टिकू तलसानिया (Tiku Talsania) यांनी अभिनेते-दिग्दर्शक अतुल काळे (Atul Kale) यांच्या ‘बाळकडू’ या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल 8 वर्षानंतर अभिनेता पुन्हा एकदा आगामी येणारा ‘झोलमॉल’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकाचे मनोरंजन करणार आहेत. 80 च्या दशकापासून चाहत्यांच्या मनावर राज्य कारणारे टिकू ‘झोलमॉल’ चित्रपटामध्ये एक आगळी वेगळी भूमिका साकारत चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

‘झोलमॉल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुबेर करत असून, नागपूरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला. त्यावेळी त्यांनी एक प्रसंग सांगितला की, “राज कुबेर यांचा फोन आला आणि त्यांनी एक मराठी चित्रपट करणार का? अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी भेटून मला चित्रपटाची कथा सांगितली आणि लगेचच मी चित्रपटासाठी होकार दिला.”

इंडस्ट्रीमध्ये त्यांना विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखले जाते. 1986 साली प्रदर्शित ‘प्यार के दो पल’ या चित्रपटामधून त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्यांनी गुजराती रंगभूमीवरून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनतर त्यांनी 1984 साली दुरर्शनवरील प्रसारित ‘ये जो है जिंदगी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी सजन रे झुछ मत बोलो, ‘हम बस बाराती’, ‘जमाना बदल गया’’ सारख्या गाजणाऱ्या मालिकांमाध्ये काम केले. यानंतर त्यांनी अंदाज अपना अपना’, ‘कुली नं-१’, ‘तराजू’, ‘हिरो नं-१’, ‘देवदास’, ‘सर्कस’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्वाची कामगिरी केली.

‘झोलमॉल’ या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव, भारत गणेशपुरे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे , हेमांगी कवी, स्मिता गोंदकर, सारखे धमाकेदार कलाकरा पाहायाल मिळणार आहेत. झोलमॉल या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुबेर यांनी केलं असून हरीषकुमार बाली यांनी निर्मिती केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
क्रिकेटनंतर आता मनोरंजनाच्याही मैदानावर उतरतोय धोनी, चित्रपटाचे मोशन पोस्टर आऊट
हाय गर्मी! कंगना रणाैतने शेअर केले बाेल्ड फाेटाेशूट, एकादा पाहा

हे देखील वाचा