Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड अभिनेता वरुण धवनची भाची अंजिनीच्या ग्लॅमरस फोटोंचा सोशल मीडियावर राडा, हॉट ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

अभिनेता वरुण धवनची भाची अंजिनीच्या ग्लॅमरस फोटोंचा सोशल मीडियावर राडा, हॉट ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

सिनेसृष्टीतील कलाकार नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मात्र, त्यांच्यासोबतच त्यांचे नातेवाईकही भलतेच चर्चेचा विषय ठरतात. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेता वरुण धवनबाबतही आहे. वरुणची भाची तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. वरुणच्या भाचीचे नाव अंजिनी धवन असे आहे.

अंजिनी ही त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे, ज्यांनी चित्रपटात पदार्पण न करूनही चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. अंजिनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आपल्या बोल्डनेसमुळेही माध्यमांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या दिवाळी सण सर्वत्र साजरा केला जात आहे. अशात सर्वजण पारंपारिक ड्रेसमध्ये दिसत आहेत, तर दुसरीकडे अंजिनीने आपल्या हॉट ड्रेसने सर्वांना सरप्राइज केले आहे. (Actor Varun Dhawans Niece Anjini Dhawan Turns Super Bold Shows off Her Beauty In A Bright Bralette)

चमकणाऱ्या ब्रालेटसह परिधान केला शरारा
खरं तर, अंजिनी धवनने दिवाळीच्या खास क्षणी आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हटके ड्रेसमध्ये पोझ देताना दिसत आहे. अंजिनीचा हा दिवाळी बोल्ड एथनिक ड्रेस खूपच चर्चेत आहे. कारण, तिने इथे एक ऑफ व्हाईट शरारासह ग्लास वर्क असलेली स्ट्रिप ब्रालेट परिधान केली आहे. नेटकरीही अंजिनीच्या या लूकची जोरदार प्रशंसा करत आहेत.

अंजिनीच्या या फोटोला आतापर्यंत १६ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहते तर सोडाच, कलाकार मंडळीही तिच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत. अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूरने अंजिनीच्या पोस्टवर कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

जगते सेलिब्रिटींप्रमाणे आयुष्य
खरं तर, अंजिनी नेहमी आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अंजिनीने यापूर्वीही आपले अनेक ग्लॅमरस फोटोंमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. अंजिनीने आतापर्यंत बॉलिवूड पदार्पण केलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग ही कोणत्याही कलाकारापेक्षा कमी नाही. तिचे अनेक स्टार किड्स मित्र आहेत. यांच्यासोबतच ती अनेक पार्ट्यांमध्ये स्पॉट होते.

अंजिनी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते, असे अनेक अंदाज तिच्याबद्दल बांधले जात आहेत. मात्र, धवन कुटुंबाकडून आतापर्यंत अशी कोणतीही बाब समोर आली नाही. अंजिनीचे वडील सिद्धार्थ वरुण धवनचे चुलतभाऊ आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कॅटरिना कैफला विकी कौशलच्या आईकडून मिळालं स्पेशल गिफ्ट! लग्नाच्या बातम्यांनी धरला जोर

-तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

-विकी कौशल आणि कॅटरिना राजस्थानमध्ये राजेशाही थाटात करू शकता लग्न, डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन रद्द

हे देखील वाचा