Sunday, December 3, 2023

विघ्नेशने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पाेस्ट; काय म्हणाला अभिनेता? लगेच वाचा

चित्रपट निर्माते विघ्नेश शिवन आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या क्युट जाेडप्याचा पहिल्या भेटीपासून ते त्यांच्या अफेअर आणि लग्नापर्यंतचा त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खूप खास आणि सुंदर राहिला आहे. गेल्या वर्षी हे जाेडपे लग्न बंधनात अडकले असून ऑक्टोबरमध्ये ते जुळ्या मुलांचे पालक झाले आहे. अशात आज म्हणजे शुक्रवारी (9 जुन)ला हे जोडपे त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत.

विघ्नेश शिवन (vignesh shivan) याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नयनतारचे जुळ्या मुलांसाेबतचे फाेटाे शेअर केले आहेत. अशात नयनतारा आपल्या मुलांसाेबत किती आनंदी आहे, हे या फाेटाेंमध्ये दिसून येते. यावेळी विघ्नेशने वेगवेगळ्या क्षणांचे फाेटाे साेशल मीडिायवर शेअर केले आहे. शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये, नयनतारा हसत असून जुळ्या मुलांसाेबत कॅमेऱ्यासमाेर पाेज देत आहेत.

हे फोटो शेअर करत विघ्नेशने लिहिले की, “तू माझ्या आयुष्याचं प्रूफ आहेस. एक वर्षात अनेक चढ-उतार आलेत. आमची वेळोवेळी परिक्षा झाली. मात्र, घरी येऊन त्या कुटुंबाला पाहणे ब्लेस्ड आहे. त्यांना बघून माझ्या आत आत्मविश्वास वाढतो आणि ते मला माझ्या स्वप्नांसाठी आणि ध्येयांसाठी काम करण्यास प्रेरित करते.” त्यांनी पुढे लिहिले, “माझे कुटुंब मला जे धैर्य देते ते सर्वांपेक्षा वेगळे आहे. मी ब्लेस्ड फील करताे, जेव्हा मी सर्वोत्कृष्ट लोकांसोबत राहताे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

नयनतारा आणि विग्नेशनचे लग्न 9 जून 2022 रोजी तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये झाले होते. त्यांचे लग्न कुटुंब आणि जवळील मित्रांमध्ये पार पडले. त्यांच्या लग्नाला रजनीकांतपासून शाहरुख खानपर्यंत दिग्गज कलाकार उपस्थित होते. लग्नानंतर काही महिन्यांनी म्हणजे ऑक्टोबरमध्ये नयनतारा सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली.(actor vignesh shivan nayanthara first anniversary filmmaker shares photos of nayanthara holding twin children writes this beautiful message)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अल्पवयीन मुलीवर बला’त्कार केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक, सोशल मीडियावर फोटो केले पोस्ट
दीपिका कक्करने जुळ्या मुलांना दिला जन्म? पती शोएब इब्राहिमने केला खुलासा

हे देखील वाचा