Thursday, June 13, 2024

लवकरच लग्नबंधनात अडकणार विजय देवरकोंडा! म्हणाला, ‘जोडीदार…’

कलाकार कुठल्याही इंडस्ट्रीचा असो, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीविषयी उत्सुकता असते. जसे की, गाडी, गर्लफ्रेंड, घर, पैसा, सिनेमा आणि लग्न. यातील सर्वात कळीचा मुद्दा असतो लग्नाचा. आपला आवडता कलाकार कधी लग्नाच्या बेडीत अडकतो, याकडे चाहत्यांची बारीक नजर असते. तसेच, ते सोशल मीडियाद्वारे कलाकाराला तसा प्रश्नही विचारतात. अशातच साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा याच्या लग्नाचा विषय चर्चेत आहे.

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याच्या फिटनेस आणि पर्सनॅलिटीवर मुली फिदा होता. त्याच्या सिनेमांपेक्षा जास्त चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्यात रस असतो. त्याचे नाव ‘डिअर कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ फेम सहअभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिच्यासोबत जोडले जाते. तसेच, असेही म्हटले जाते की, ते गुपचूप एकमेकांना डेट करत आहेत. अशात एका कार्यक्रमादरम्यान विजयने लग्नाविषयी भाष्य केले आहे, ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाला विजय?
विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने लग्नासाठी तयार असण्याबाबत मोकळेपणाने भाष्य केले आहे. तसेच, अभिनेता असेही म्हणाला की, तो आता जोडीदार शोधत आहे. विजय म्हणाला, “मला लवकर लग्न करण्याची गरज आहे. माझे लग्न आसपासच आहे. मी घाबरलो नाहीये आणि आता या विचारासोबत कंफर्टेबल आहे. आधी लग्न एक असा शब्द होता, जो माझ्या जवळपास कुणालाही बोलण्याची परवानगी नव्हती. यामुळे लगेच चिडचिड व्हायची. मात्र, आता मी याबाबत चर्चा करत आहे.”

विजय शोधतोय जोडीदार
अभिनेता आता 34 वर्षांचा आहे. तो पुढे म्हणाला की, “मी आता माझ्या मित्रांना लग्न करताना पाहतोय आणि मी याचा आनंद घेत आहे. हा आयुष्यातील असा अध्याय आहे, जो प्रत्येकाने अनुभवला पाहिजे. मी विवाहित आयुष्याचा आनंद घेण्याची आशा करतो. मी काही काळापासून जोडीदार शोधतोय. मी आता लग्नासाठी तयार नाहीये, पण हो काही वर्षांमध्ये होऊ शकते.”

रश्मिका मंदानाला करतोय डेट?
मागील काही वर्षांपासून विजय देवरकोंडा याचे नाव रश्मिका मंदाना हिच्यासोबत जोडले जात आहे. दोघेही लवकरच एकत्र दिसू शकतात. मात्र, जेव्हा सुट्ट्यांचे फोटो शेअर करतात, तेव्हा फोटोचे बॅकग्राऊंड जवळपास एकसारखेच असते. मग ते मालदीव ट्रीप असो किंवा रश्मिकाचा वाढदिवस. चाहतेही म्हणतात की, जगापासून हे आपले नाते लपवून ठेवतात.

आता विजयने लग्नाबाबत भाष्य केल्यामुळे चाहत्यांना त्याच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. तसेच, त्याची होणारी पत्नी कोण असेल, याबाबतही चर्चा रंगली आहे. (actor vijay deverakonda going to get married soon says this lets know)

महत्त्वाच्या बातम्या-
रजनीकांत यांच्या ‘Jailer’चा बॉक्स ऑफिसवर राडा, पहिल्या दिवशी छापले तब्बल ‘एवढे’ कोटी
श्रीलंकेची सुंदरी अशी झाली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री, हॉलिवूड अभिनेत्री व्हायचे स्वप्न असलेल्या जॅकलिनचा सिनेप्रवास

हे देखील वाचा