×

Birthday | वाचा विजय देवरकोंडाबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशभरात विजयच्या अभिनयाचे आणि लूकचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. सोशल मीडियावरही विजयचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. सोमवार ९ मे या दमदार अभिनेत्याचा वाढदिवस. जाणून घेऊया त्याच्या सिने जगतातील वाटचालीबद्दल. 

View this post on Instagram

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

विजय देवरकोंडाचा जन्म ९ मे १९८९ रोजी एका तेलुगू कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव देवराकोंडा गोवर्धन राव आणि आईचे नाव माधवी देवराकोंडा आहे. देवरकोंडा गोवर्धन राव हे दक्षिणेतील छोट्या पडद्यावरील कलाकार आहेत. विजय देवरकोंडाच्या धाकट्या भावाचे नाव आनंद देवराकोंडा आहे. विजय देवरकोंडाचे कुटुंबीय त्याला राउडी म्हणत. त्यामुळेच त्याचे चाहते त्याला राऊडी म्हणतात.

View this post on Instagram

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

विजय देवरकोंडाच्या चित्रपट प्रवासाविषयी सांगायचे तर, त्याने २०११ साली दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रवी बाबू यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नुव्विला’ हे त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते. हा एक मल्टिस्टारर चित्रपट होता. या चित्रपटात रवी बाबूंनी सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यापैकी एक होता विजय देवराकोंडा आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम. ‘नुव्विला’ चित्रपटानंतर विजय देवरकोंडाने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले.

View this post on Instagram

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

विजयने २०१६ मध्ये ‘पेल्ली चोपुलु’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाला तेलुगू भाषेतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. परंतु विजयला २०१७ मध्ये ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटाने अधिक ओळख मिळाली. या चित्रपटाने केवळ दक्षिण भारतात चाहत्यांची संख्या वाढवली नाही, तर उत्तर भारतातील प्रेक्षकांनाही त्याचा अभिनय खूप आवडला. यानंतर, विजय ‘NOTA’, ‘डिअर कॉम्रेड’, ‘मेहनती’ आणि ‘वल्ड फेमस लवर’ सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसला.

View this post on Instagram

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

विजय देवरकोंडा हा एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच एक चित्रपट निर्माता देखील आहे. हिल एंटरटेनमेंट असे त्याच्या निर्मिती संस्थेचे नाव आहे. या अंतर्गत त्याने गेल्या वर्षी ‘मीकू माथरामे चेपथा’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. याशिवाय विजय देवरकोंडा उत्पन्नाचा स्त्रोतही त्यांचा ब्रँड आहे. ‘राऊडी वेअर’ असे त्यांचे ब्रँड नाव आहे. त्याने हा ब्रँड यावर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला. विजय देवरकोंडा हे एक NGO देखील चालवतो, ज्याचा उद्देश बेरोजगार तरुणांना काम आणि प्रशिक्षण देणे हा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post