विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’चे भारतात प्रदर्शन रोखण्यासाठी धमक्या येत आहेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. विवेकचा ‘द काश्मीर फाइल्स’ अमेरिकेत ३० हून अधिक वेळा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच ११ मार्च रोजी भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. यावर्षी देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘द काश्मीर फाइल्स’चे पोस्टर अमेरिकेतील बिग ॲपलच्या टाइम्स स्क्वेअर टॉवरवर लावण्यात आले होते.
काश्मिरी पंडित समुदायाच्या नरसंहारातील पहिल्या पिढीतील पीडितांच्या दस्तऐवजीकरण फुटेज आणि व्हिडिओ मुलाखतींवर आधारित ‘काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) ही सत्य कथा आहे. जी काश्मीरमधून समुदायाच्या मोठ्या प्रमाणात पलायनाबद्दल माहिती देते. माध्यमांतील वृत्तानुसार, विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
‘काश्मीर फाईल्स’ आहे सत्यकथा
याआधी विवेक अग्निहोत्री म्हणाले होते की, “प्रेक्षकांनी चित्रपटाकडून काही अपेक्षा करू नये. कारण तुम्हाला सत्याकडून काय अपेक्षा आहे? चित्रपट खरा आहे, चित्रपटाचा प्रत्येक शब्द खरा आहे, प्रत्येक कथा खरी आहे. लोकांना वाटेल की, हा चित्रपट सांप्रदायिक मुद्द्यांवर आहे किंवा विशिष्ट समुदायांना किंवा हिंगोइझमला शाप देणारा आहे. पण चित्रपटाच्या पाच मिनिटांनंतर त्यांना कळेल की असे काहीही होणार नाही.”
प्रत्येक भारतीयाचा चित्रपट असेल ‘द काश्मीर फाइल्स’
विवेक पुढे म्हणाले की, “सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा चित्रपट जी भावना निर्माण करत आहे, तो फक्त काश्मिरी पंडितांचा चित्रपट नाही. तर तो प्रत्येक भारतीयाचा चित्रपट आहे. खूप निराशा आणि रडत असतानाही लोकांना एकमेकांशी जोडलेली आणि एकतेची भावना जाणवेल. जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडतील तेव्हा त्यांना वाटेल की, जोपर्यंत आम्ही बोलू, तोपर्यंत आशा आहे.” आता विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
- ‘या’ गायकाला उर्फी जावेद करत आहेत डेट, सोशल मीडिया पोस्ट होतायेत जोरदार व्हायरल
- बप्पी लहरी यांच्या अंत्यसंस्कारवेळी मुलगी रीमाची रडून रडून झाली वाईट अवस्था, मुलगाही झाला भावुक
- दुःखद! मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, सोशल मीडियावर अर्पण होतीये श्रद्धांजली