बापरे रे बाप.!! जेवढा लग्नात खर्च नाही झाला, तितका तर काडीमोड घेताना झालाय; पाहा बॉलिवूडमधील महागडे घटस्फोट

most expensive divorces of bollywoodबापरे रे बाप.!! जेवढा लग्नात खर्च नाही झाला, तितका तर काडीमोड घेताना झालाय; पाहा बॉलिवूडमधील महागडे घटस्फोट


बॉलिवूडमधील कलाकार त्यांच्या लग्नात सहसा भरमसाठ खर्च करतात. दोन्ही व्यक्ती जर सेलिब्रेटी असतील तर मग बोलायलाच नको. त्यातही त्यांच्या या लग्नाची चर्चा पुढे अनेक दिवस चालत राहते. परतू, आज आपण या लेखात बॉलिवूडमधील सेबेल्सच्या नाते जुळण्याबदद्ल नाही तर, त्यांच्या तुटलेल्या नात्याबाबत बोलणार आहोत.

हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नानंतर घटस्फोट झाल्यास महिलेला तिच्या पतीकडून पोटगी मिळते. अशाच काही प्रमाणात नियमान्वये इतर धर्मातील महिलांनाही गुजारा भत्ता मिळतो. याच कायद्याच्या आधारे बॉलिवूडमधील काही नात्यांच्या ताटातुटीनंतर मात्र एक नवीनच माहिती समोर आली आहे, ती म्हणजे बॉलिवूडमधील कलाकारांचे ‘महागडे घटस्फोट’.

काही सेबेल्सच्या लग्नात जितका खर्च झालेला नाहीये, तितका खर्च त्यांच्या घटस्फोटावेळी झालेला दिसून येत आहे. तर काही घटस्फोटातील आकडेवारी पाहून आपण नक्कीच हैराण व्हाल. तर पाहूयात बॉलिवूडमधील असे काही घटस्फोट ज्यावेळी पार्टनरला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे.

  • हृतिक रोशन आणि सुजैन

हृतिक रोशनबद्दल बोलायचे झाल्यास, तो बॉलिवूड सृष्टीतील त्या कलाकरांपैकी एक आहे ज्याचा खूपच महागडा घटस्फोट झाला आहे. त्यानी त्याची पत्नी सुजैनसोबत लग्नाच्या 14 वर्षानंतर घटस्फोट घेतला. 2014 मध्ये झालेल्या घटस्फोट साठी त्याने सूजैनला ‘380 कोटी रुपये’ दिले होते

  • सैफ अली खान आणि अमृता सिंग

सैफ अली खानने त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी असणाऱ्या अमृता सिंग सोबत लग्न करून सगळ्या चित्रपटात सृष्टीला आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांना दोन मुले देखील झाली आहेत. परंतु लग्नाच्या 13 वर्षानंतर त्या दोघांनीही घटस्फोट घेतला. त्यासाठी सैफने अमृताला ‘5 कोटी रुपये’ दिले होते.

  • संजय कपूर आणि करिश्मा कपूर

व्यावसायिक संजय कपूरने अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न केले होते. परंतू, त्यांचे हे लग्न अधिक काळ टिकू शकले नाही. संजय यांनी करिश्मासोबत घटस्फोट घेण्यासाठी एक घर आणि दोन्ही मुलांच्या नावावर ’14 कोटी रुपये’ दिले होते.

  • संजय दत्त आणि रिया पिल्लई

संजय दत्तची पहिली पत्नी ऋचाच्या मृत्यूनंतर त्याने रिया पिल्लई हिच्यासोबत लग्न केले होते. परंतु 1998 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्याने घटस्फोटासाठी एक ‘सी फेस अपार्टमेंट आणि एक कार’ दिली होती. ज्याची किंमत कित्येक कोटींच्या घरात होती.

  • फरहान अख्तर आणि अधुना

सन 2016 मध्ये फरहान अख्तरने पत्नी ‘अधुना’ सोबत घटस्फोट घेतला होता. त्याने त्यासाठी तिला ‘एक बंगला’ दिला होता. त्या बंगल्याच्या नाव विपाशना हे आहे. या बंगल्याची किंमत कोटींच्या घरात आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.