×

मानलं राव! ‘या’ कलाकारांनी तत्वांसाठी धुडकावल्यात कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती

मनोरंजन विश्वातील कलाकार चित्रपटांच्या माध्यमातून मोठी कमाई करतात. आलिशान जीवन जगणारे हे कलाकार केवळ चित्रपटातूनच नव्हे तर जाहिराती किंवा ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतात. कोणतेही उत्पादन किंवा ब्रँड लोकांपर्यंत नेण्यासाठी भारतीय कलाकारांपासून ते परदेशी सेलिब्रिटींपर्यंत मोठमोठ्या कंपन्यांचे मालक या कलाकारांची मदत घेतात. मात्र अनेक चित्रपट कलाकार त्यांच्या जाहिरातींच्या निवडीमुळे नेहमीच चर्चेत असतात. एकीकडे अनेक नामवंत कलाकारांना त्यांच्या जाहिरातींसाठी ट्रोल केले जाते, तर तिकडे त्यांच्या तत्त्वांसाठी आणि चाहत्यांच्या हितासाठी करोडोच्या जाहिराती नाकारणारे अनेकजण आहेत. पाहूया कोणते आहेत ते कलाकार.

सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajpoot)
जगाचा निरोप घेतलेला प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानेही फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करण्यास नकार दिला होता. बातम्यांनुसार, या जाहिरातीसाठी त्याला १५ कोटींची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्याच्या तत्त्वांच्या विरोधात जाऊन अशा जाहिरातीत सामील होणे सुशांत सिंग राजपूतला अजिबात आवडले नाही.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma)
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही फेअरनेस क्रीमची जाहिरात केलेली नाही. वास्तविक, अभिनेत्रीने फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली. कारण तिला असे वाटते की, अशी उत्पादने समाजात वर्णद्वेष वाढवण्याचे काम करतात.

जॉन अब्राहम (John Abraham)
बॉलिवूडचा ऍक्शन स्टार जॉन अब्राहम केवळ त्याच्या फिटनेसबद्दल जागरूक नाही, तर इतरांचीही खूप काळजी घेतो. हेल्दी राहण्यासाठी अभिनेता खूप कडक डाएट फॉलो करतो. जॉनला अनेक तंबाखू आणि अल्कोहोल कंपन्यांकडून जाहिरातींसाठी ऑफर मिळाल्या आहेत. मात्र, त्यांच्या तत्त्वांमुळे त्यांनी या जाहिराती करण्यास नकार दिला.

करीना कपूर (Kareena Kapoor)
बॉलिवूडमध्ये बेबो म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री करीना कपूर हिने पोल्ट्री उत्पादनांच्या जाहिराती नाकारल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीनाला पोल्ट्री प्रोडक्ट विकणाऱ्या कंपनीने करोडोंच्या जाहिरातीची ऑफर दिली होती. पण आता शाकाहारी झालेल्या या अभिनेत्रीने ही जाहिरात करण्यास नकार दिला आहे.

साई पल्लवी (Sai Pallavi)
या यादीत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीचाही समावेश आहे. अभिनेत्रीने तिच्या तत्त्वांच्या विरोधात जाऊन फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, या जाहिरातीसाठी अभिनेत्रीला दोन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, मात्र अभिनेत्रीने ते मान्य केले नाही.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) – अलीकडेच लग्न झालेल्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनेही फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करण्यास नकार दिला आहे. वास्तविक, अभिनेत्याचे असे मत आहे की अशी उत्पादने वर्णद्वेषाला प्रोत्साहन देतात. या त्याने ९ कोटींच्या जाहिरातीचा करार नाकारला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post