अभिनेत्री किंवा हिरोइन म्हणलं की सुडौल, कमनीय बांधा, गोरा रंग आणि चवळीच्या शेंगेसारखे नाक अशाच अपेक्षा किंवा क्रम आजपर्यंत ठरला होता. मात्र ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील लतिकाच्या भूमिकेने या सगळ्या प्रथा आणि आखलेले नियम मोडित काढले आहेत. या मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईकच्या (Akshya Naik) जाडीचे तिच्या शारिरिक रचनेची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. तिच्या या लूकवर अनेकदा तिला समाज माध्यमांतून टीकेला सामोरे जावे लागते. मात्र ती या सगळ्या गोष्टींना, चर्चांना आणि टीकांना केराची टोपली दाखवत तिचे आयुष्य जगत असते. सध्या तिच्या होळीच्या रंगात रंगलेले फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.
कलर्स वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका सध्या घराघरात प्रसिद्ध आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत. मात्र मालिकेत सर्वात जास्त चर्चा होते ती लतिकाच्या भूमिकेची. मालिकेत आपल्या जाडीने लतिका प्रचंड चर्चेत आली होती. मात्र आता तिच्या याच जाडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असून, तिच्या अभिनयाचे आणि भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. त्यामुळे आजपर्यंत सडपातळ बांधा म्हणजेच हिरोइन या परंपरेलाच तिने फाटा दिला आहे.
लतिकाचे म्हणजेच अक्षया नाईकचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिने रंगपंचमीचा आनंद लुटतानाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत जे सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत.
याआधी एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री अक्षया नाईकने आपल्या या जाडीबद्दल आणि लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल परखड मत व्यक्त केले होते. यावेळी तिने “लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मी माझ्या कामाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना आकर्षित करत असते” अशी प्रतिक्रिया दिली होती. यापुढे बोलताना तिने “सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील भूमिकेने मला सगळीकडे ओळख मिळवून दिली असुन यामधील लतिकाच्या भूमिकेला आपल्या अभिनयाने कसा न्याय देता येईल याचाच मी नेहमी विचार करत असते” अशी प्रांजळ कबुली दिली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –










