पांढऱ्या फ्रॉकमध्ये कमाल दिसतेय अक्षया नाईक, गोड गोंडस लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष!

अक्षया नाईक (Akshaya Naik) टेलिव्हिजन मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती एक उत्तम नृत्यांगना आणि गायिका आहे. तिचा जन्म १२ जुलै १९९५ला, मुंबई येथे झाला. स्टार प्लसवरील ये रिश्ता क्या कहलाता है टीव्ही मालिकेतील अनन्या शर्मा या व्यक्तिरेखेने तिला नावारूपाला आणले. शिवाय २०२०मध्ये आलेल्या ‘फिट इंडिया वेब सिरीज’मध्ये तिने गानू ही व्यक्तिरेखा साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली. ‘क्राइम पेट्रोल’ सारख्या शोमध्येही अक्षयाने काम केले आहे.

अक्षय नाईक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत काही ना काही शेअर करत, चाहत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटवरून एक नवीन फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. या फोटोमध्ये गोड-गोंडस अक्षया खूपच सुंदर दिसत आहे. हा फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. सुंदर अशा फ्रॉकवर लाल रंगाची रिबीन देखील आहे. सिंपल लूक करून अक्षयाने फोटोसाठी अतिशय मस्त पोझ दिली आहे. (Akshaya Naik cute look goes viral on internet)

View this post on Instagram

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

चाहत्यांनी देखील त्या फोटोला पसंती दर्शवली आहे. बघता बघताच या फोटोवर हजारोंच्या संख्येने लाइक्स आले आहेत. चाहते कमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्रीच्या लूकचे भरभरून कौतुक करत आहेत.

अक्षयाची प्रतिभा पाहता तिला ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही तिची पहिली मराठी मालिका मिळाली. लतिका ही व्यक्तिरेखा तिने इतकी उत्तमरित्या साकारली, की अल्पावधीतच तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तिच्या साध्या सोप्या अभिनयामुळे ती प्रेक्षकांना आपलीशी वाटली. तिने आपल्या वजनाचा न्यूनगंड न बाळगता, त्याच गोष्टीला तिने आपला प्लस पॉइंट बनवला. तिचा आत्मविश्वास आणि कामावरची निष्ठा या सगळ्या गोष्टींमुळे चाहत्यांच्या मनात तिच्यासाठी खास आदर आहे.

Latest Post