Wednesday, July 3, 2024

मिनी ड्रेसमध्ये दिसली ‘डार्लिंग’ आलिया, सोशल मीडियावर रंगलीय बेबी बंपमधील फोटोंची चर्चा

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यातून जात आहे. अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत लग्न केल्यानंतर केवळ दोन महिन्यांनी तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली की, ती आणि रणबीर लवकरच आई-वडील होणार आहेत. आलियाच्या प्रेग्नंसीने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. आलिया स्वतःची आणि बाळाची पूर्ण काळजी घेत आहे, पण त्याचवेळी ती तिच्या कारकिर्दीवरही पूर्ण लक्ष केंद्रित करते. तिचा हॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन‘चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर ती सध्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt) ही बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे, जी सध्या खूप चर्चेत असते. सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट गरोदर आहे आणि तिच्या गर्भधारणेच्या टप्प्याचा आनंद घेत आहे. अलीकडे, अभिनेत्री ‘डार्लिंग्स’ टीमसोबत दिसली होती, जिथे ती बेबी बंप दाखवताना (Alia Bhatt flaunts Baby Bump) दिसली होती. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो (Alia Bhatt’s Pregnancy Glow) देखील दिसला.

‘डार्लिंग’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आलिया
अभिनेत्री आलियाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप झळकत आहेत. अलीकडेच ती तिच्या ‘डार्लिंग्स’ (darlings) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दिसली, जिथे ती एक क्यूट मिनी ड्रेस परिधान करून आली होती. या प्रमोशनदरम्यानचे अनेक फोटो समोर आले आहेत, जे आता इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत.

आलियाने दाखवला बेबी बंप
पेस्ले-प्रिंट मिनी ड्रेसमध्ये आलिया नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. आलियाने लाइट मेकअप, हुप्स आणि मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला. आलिया ‘डार्लिंग्स’ टीमसोबत पोझ देताना दिसत आहे. हे फोटो पाहून चाहते खूपच उत्सुक आहेत.

‘डार्लिंग्स’मधून आलिया करत आहे नवीन सुरुवात
या चित्रपटाद्वारे आलिया निर्माती म्हणून तिचा नवीन प्रवास सुरू करत आहे. ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. ‘डार्लिंग्स’ हा डार्क कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. मुंबईत आपली जागा मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आई-मुलीचे जीवन या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘नेक्स्ट टाईम एकदाच सांगेन…’, फोटोग्राफर्सने हद्द पार करताच भडकला साऊथ सुपरस्टार
‘मला लाज नाही वाटत, माझे वडील मुख्यमंत्री असताना मी ४-५…’, रितेशचे रोखठोक विधान
क्रिकेट खेळताना झाली होती लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांची भेट; मैत्री इतकी खास की, एकाचवेळी पडलेले प्रेमात

हे देखील वाचा