Tuesday, May 14, 2024

पधारो म्हारे देस! लंडनहून बेबी बंपसह मुंबईत परतली आलिया, रणबीरला पाहताच मारली कडकडीत मिठी

सध्या सर्वाधित चर्चेत असलेलं जोडपं म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर होय. या दोघांनीही त्यांच्या लग्नांतर दोन महिन्यातच प्रेग्नंसीची घोषणा केली. यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वारे वाहू लागले. आलिया मागील काही दिवसांपासून तिच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये होती. आता ती मुंबईत परतली आहे. यादरम्यान आलिया जशी विमानतळावर पोहोचली, तेव्हा तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पॅपराजींनी गर्दी केली. यावेळी आलिया तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. यावेळी रणबीरला पाहून तर आलिया खूपच खुश झाली आणि ती आपल्या भावना नियंत्रित करू शकली नाही. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आलिया भट्ट (Alia Bhatt) ही विमानतळावर येताच खूपच आरामदायी कपड्यांमध्ये दिसली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाच्या शर्टसोबत मॅचिंग जॅकेट आणि सैल पँट परिधान केली होती.

आलियाच्या बेबी बंपवर टिकल्या सर्वांच्या नजरा
आलियाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आलियाला पाहताच पॅपराजींनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. यावेळी आलिया खूप आनंदी दिसत होती. सर्वांचे हात जोडून अभिनंदन स्वीकारत तिनी आभारही मानले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांच्या नजरा तिच्या बेबी बंपवर खिळल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रणबीरला पाहताच धावली आलिया
लवकरच बाप होणार असलेल्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने विमानतळावर पोहोचून आलियाला मोठं सरप्राईज दिलं. आलियालाही याची माहिती नव्हती, पण रणबीर कपूरही कारमध्ये तिची वाट पाहत असल्याचे पॅपराजींनी सांगताच ती न थांबता धावू लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गाडीमध्ये रणबीरला मारली एकदम घट्ट मिठी
रणबीरला पाहताच अभिनेत्रीने ‘बेबी,’ म्हणत त्याला घट्ट मिठी मारली. यादरम्यान दोघांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स सांगत होते की, ते एकमेकांना पाहून किती आनंदी आहेत.

‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त
आलिया भट्ट आता मुंबईत परतली आहे. हे जोडपे लवकरच आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी आपला आगामी ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त राहणार असल्याचे बोलले जात आहे. हे जोडपं पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पहिल्याच सीनने पर्ल व्ही पुरीने मिळवले होते प्रेक्षकांच्या मनात स्थान, ‘त्या’ एक चुकीने सगळं बिघडलं

‘एकदम नशेत’, म्हणत ‘या’ अभिनेत्याने केली मोनालिसा अन् तिच्या पतीच्या व्हिडिओवर कमेंट, तुम्हीही पाहा

मराठी सिनेसृष्टीत येतंय सिक्वेलचं वादळ, ‘या’ ५ चित्रपटांचे पुढील भाग होणार प्रदर्शित

हे देखील वाचा