बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील झाले आहेत. आलिया आणि रणबीर रविवारी (दि. 6 ऑक्टाेबर)ला सकाळी मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि काही तासांनंतर आलियाने मुलीला जन्म दिला. आलिया हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तिची सासू आणि रणबीर कपूरची आई नीतू कपूर याही हॉस्पिटलमध्ये पाेहचल्या. या गुड न्यूजनंतर आता आलियाची तब्येत कशी आहे याची चाहत्यांना चिंता लागली आहे. अशा परिस्थितीत ही चिंता दूर करणारी बातमी समोर आली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) आई झाल्यानंतर पूर्णपणे निरोगी आहे. याशिवाय कपूर कुटुंबाच्या घरी आलेली छोटी परीही निरोगी जन्माला आली आहे. या माहितीनंतर कुटुंबाव्यतिरिक्त चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. नीतू कपूर (neetu kapoor) आणि आलियाची आई सोनी रझदानी (soni razdan) आणि तिची बहीण शाहीन भट्ट(shaheen bhatt) यांना ही आनंदाची बातमी मिळाल्यानंतर त्या भावूक झाल्या आहेत.
View this post on Instagram
आलिया भट्टने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिच्या मुलीच्या जन्माची बातमी सांगितली आहे. आलियाच्या अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये लिहिले आहे की, “आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी. आमची मुलगी आली आहे आणि ती खूप गोंडस आहे. आम्ही अधिकृतपणे पालक झालो आहोत.”
आलिया अन् रणबीर 14 एप्रिलला अडकले लग्न बंधनात
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. 2018 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. दोन्ही कलाकार जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. यावर्षी 14 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीरने त्यांच्या घरी जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न केले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लावणीसम्राज्ञी मेघा घाडगेंनी गौतमी पाटीलवर केली टिका; म्हणाली,’परकर वर करेन अन् पाण्याची…’
स्टार किड्सचा जलवा! ‘या’ कलाकारांनी स्वतःच्या कमाईवर घेतलेत आलिशान बंगले