Wednesday, March 29, 2023

‘स्ट्रगलिंग अभिनेत्यासारखे का वागताय?’, म्हणणाऱ्या युजरला धरम पाजींचे दमदार उत्तर; तुम्हीही कराल कौतुक

सोशल मीडियावर सामान्य व्यक्तींसोबतच कलाकारही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्ये ते फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत संवाद साधतात. मात्र, काही वेळा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. या ट्रोलिंगला ते ज्याप्रकारे प्रत्युत्तर देतात, त्याकडे सर्वांचे लक्ष असते. असेच काहीसे ‘ही मॅन’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना एका युजरने ट्रोल केले. मात्र, त्यांनीही असे काही प्रत्युत्तर दिले, ज्याने सर्वांची मने जिंकली आहेत. नेटकरीही त्यांची प्रशंसा करत आहेत.

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी नुकतेच त्यांच्या ‘ताज- डिव्हायडेड बाय ब्लड’ (Taj Divided By Blood) या आगामी वेबसीरिजमधील पहिला लूक शेअर केला आहे. यामध्ये ते सूफी संत शेख सलीम चिश्ती यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या पहिल्या लूकमध्ये धर्मेंद्र यांना ओळखणे चाहत्यांना खूपच कठीण होत आहे. हाच लूक पाहून एका ट्विटर युजरने धर्मेंद्र यांना ट्रोल केले (User Troll Dharmendra). त्यानंतर 87 वर्षीय धर्मेंद्र यांनीही हजरजबाबी आणि विनम्र उत्तर दिले.

धर्मेंद्र यांचे ट्वीट
पहिला लूक शेअर करत धर्मेंद्र यांनी ट्वीट केले की, “मित्रांनो, मी ताज सिनेमात शेख सलीम चिश्ती…एक सूफी संतची भूमिका साकारत आहे. एक छोटी पण महत्त्वाची भूमिका… तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.” या लूकमध्ये धर्मेंद्र लांब दाढी, डोक्यावर साफा आणि सूफी संतांचे कपडे परिधान केल्याचे दिसत आहेत.

नेटकऱ्याची कमेंट
या ट्वीटवर एका युजरने कमेंट केली की, “ते एका स्ट्रगलिंग अभिनेत्यासारखे का वागत आहेत?” यावर धर्मेंद्र यांनी उत्तर देत लिहिले की, “वैष्णव, जीवनात नेहमी एक सुंदर संघर्ष आहे. तुम्ही, मी प्रत्येकजण संघर्ष करत आहे… विश्रांतीचा अर्थ आहे… तुमच्या प्रिय स्वप्नांचा अंत… तुमच्या सुंदर यात्रेचा अंत.”

कशी आहे सीरिज?
या सीरिजमध्ये मुघल साम्राज्यातील अनेक गुपीतं बाहेर येणार आहेत. या ऐतिहासिक वेब सीरिजमध्ये दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह राजा अकबराची भूमिका साकारत आहेत. सीरिजमध्ये अनारकलीची भूमिका अदिती राव हैदरी साकारत आहे, तर राजा सलीमच्या भूमिकेत आशिम गुलाटी आहे. या सीरिजमध्ये राजा मुराद याची भूमिका ताहा शाह आणि राजा दानियालची भूमिका शुबम कुमार मेहरा साकारणार आहे. सीरिजमध्ये राणी जोधा बाईंची भूमिका संध्या मृदुल साकारणार आहे. याव्यतिरिक्त राणी सलीमाच्या भूमिकेत झरीना वहाब आणि मेहरुन्निसाच्या भूमिकेत सौरसेनी मैत्रा दिसणार आहे. तसेच, मिर्झा हकीमची भूमिका अभिनेता राहुल बोस साकारणार आहे. (actor dharmendra new film a person trolled and said behave like a struggling actor give this answer)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शाहरुखने केले सिद्ध! ‘पठाण’ सिनेमाची 500 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, आता लक्ष्य 1000 कोटींवर
लग्नाला आठवडा होताच कियाराला सोडून कामावर परतला सिद्धार्थ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

हे देखील वाचा